हिंजवडी, ता. २१ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये नुकताच शुभारंभ झाला. सरपंच गणेश जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या अभियानात सहभाग घेऊन हिंजवडी ग्रामपंचायत सर्व निकषांवर अव्वल आणून शासनाकडून पुरस्कार मिळविण्याचा निर्धार जांभुळकर यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी एकदिलाने केला.
राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका, जिल्हा महसूल विभाग व राज्य स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री महोदय यांच्या ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानिमित्त शासन आदेशानुसार ग्रामपंचायत हिंजवडी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी मुळशीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, विस्तार अधिकारी एम.पी. चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहिली. त्यात, सभेच्या विषयपत्रिकेवर प्रामुख्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील ध्येय, उद्दिष्ट्ये त्यांचे निकष, विविध समित्यांची स्थापना, राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय गटनिहाय स्पर्धा, बक्षिसे याबाबत भागवत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सभेचे अध्यक्ष म्हणून गणेश बन्सीलाल जांभुळकर व सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी सोमाजी खैरे यांनी कामकाज पाहिले. यावेळी, उपसरपंच दीपाली जांभुळकर, सदस्य सचिन जांभुळकर, मयूर साखरे, सदस्या ऐश्वर्या वाघमारे, पल्लवी गंगावणे आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, दिव्यांग बांधव, महिला बचत गट, वाड्या वस्त्यांवरील बंधू-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, महसूल अधिकारी विवेक थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत शिवार पाणंद रस्ते विषयक विस्तृत माहिती दिली. सोमाजी खैरे यांनी आभार मानले.
WKD25A09527
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.