पिंपरी-चिंचवड

वाहतूक कोंडी होतेय, मग ‘ट्रॅफिक बडी’ ला कळवा !

CD

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ९ : तुमच्या भागांत वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग होत आहे. रस्तेही खराब आहेत. मग, चिंता करु नका.
अशा दैनंदिन समस्यांची पुराव्यांसह तक्रार नोंदवता यावी, यासाठी पोलिसांनी ‘ट्रॅफिक बडी’ चॅटबॉट विकसित केला आहे. त्याबाबत पोलिसांकडून वाकडमधील विविध सोसायट्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व वाकड वाहतूक विभागाच्यावतीने वाकड येथील सोसायट्यांमध्ये ‘वाहतूक मित्र’ जागरूकता सत्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पोलिसांकडून रहिवाशांना ‘ट्रॅफिक बडी’ चॅटबॉटचा वापर शिकविला जात आहे. पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकारातून आतापर्यंत रिदम, वेस्टर्न अव्हेन्यू, अक्षर एलमेंटा, संस्कृती, कल्पतरू हार्मनी मिळून सहा सोसायट्यांत ही सत्रे झाली आहेत. ‘ट्रॅफिक बडी’ चॅटबॉट सोपे आणि प्रभावी असून मोबाईलवरुन +९१ ८७८८६४९८८५ या व्हॉट्सअपवर क्रमांकावर काही सेकंदांत तक्रार दाखल करणे शक्य होत आहे. कल्पतरू हार्मनी सोसायटीत झालेल्या सत्रात सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश नांदुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुकर थोरात, कपिल साबळे व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

‘ट्रॅफिक बडी’ ही सुविधा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. या सहज, सोप्या व्हॉट्स ॲपबेस चॅटबॉटद्वारे नागरिकांना आपल्या विविध वाहतूक समस्या तत्काळ सोडविता येत आहेत. आजवर हजारो तक्रारींचे आम्ही निवारण केले आहे.
- मधुकर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिसांचे मार्गदर्शन मौल्यवान ठरले. आम्ही इतर सोसायट्यांनाही अशी सत्रे आयोजित करण्याचे आवाहन करतो. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी समाजातील विविध घटकांची साथ अतिशय महत्त्वाची आहे.
- विकास बाबर, अध्यक्ष, कल्पतरू हार्मोनी सोसायटी

असे आहे ‘ट्रॅफिक बडी’
- जिओ फेन्सिंगद्वारे ‘ट्रॅफिक बडी’ चॅटबॉटची रचना
- शहरातील १४ वाहतूक विभागांचा समावेश
- ज्या त्या भागातील तक्रार संबंधित विभागालाच प्राप्त होते
- त्यानुसार पुढील कार्यवाही तत्काळ केली जाते.
- वाहतूक अडचणी, पार्किंगची गैरसोय, नियमभंग याबाबत सोप्या पद्धतीने तक्रार नोंदवणे शक्य

अशी करता येईल तक्रार
- फक्त ‘Hi’ असा मेसेज पाठवा आणि पुढील निर्देशांचे पालन करा
- आपले नाव व भाषा सांगून (माहिती गोपनीय) तक्रार नोंदवा
- वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, अनियमितता, रस्त्याचे नुकसान, बेकायदेशीर पार्किंग, सिग्नल समस्या, आपला सल्ला, जड वाहनांकडून नियमभंग या पर्यायांपैकी आवश्यक पर्याय निवडा
- तक्रार ऑनलाइन नोंदवून पोचपावती, पुढील माहिती लगेच व्हॉट्सअॅपवर प्राप्त होईल


WKD25A09800

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT