वाकड, ता. ९ : कस्पटे वस्ती येथील बीआरटी बस थांबा शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री थरारक अपघाताचा साक्षीदार ठरला. भरधाव दुचाकी थेट बस थांब्याच्या लोखंडी ग्रीलवर जाऊन धडकून दुचाकीस्वार तरुणाचे डोके ग्रीलच्या मधल्या जागेत घुसले. मानेच्या खालचा भाग बाहेर आणि डोके आत अशी भयावह अवस्था झाली. अर्ध्या तासांच्या जीवघेण्या संघर्षानंतर बेशुद्ध अवस्थेतील त्याची सुटका करुन त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.
अजित लक्ष्मण कडू (वय ३२, रा. नऱ्हे, वडगाव बुद्रुक) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक असलेले अजित हे रहाटणी येथील हॉटेल बंद करून नेहमीप्रमाणे एमएच १४ जीके ५८४१ या दुचाकीवरून वेगात घरी जाण्याच्या प्रयत्नात होते. रात्रीच्या अंधारात कस्पटे वस्ती येथील बीआरटी बस थांब्याचा अंदाज न आल्याने दुचाकीची जोरदार धडक थांब्याला बसली. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या अजित यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
रक्त वाहताना पाहून कुणीही नागरिक हात लावायला धजावत नव्हते. डोके दाबले गेले; तर प्राण जाईल, अशी भीती सर्वांना होती. वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मारणे हे रात्रीची गस्त घालत होते. त्यांना हा प्रकार कोणीतरी सांगताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी आकाश जगताप आणि नागरिकांच्या मदतीने त्यांनी हाताने ग्रीलचे लोखंड वाकविण्याचा प्रयत्न सुरू केला. अर्ध्या तासाच्या जीवघेण्या संघर्षानंतर अजित यांचे डोके ग्रीलमधून बाहेर काढून रिक्षातून तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रक्ताने हात भिजले, पण थांबलो नाही...
अपघात पहिल्या क्षणी डोळ्यांवर विश्वास बसला नाही. डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध होता. दुचाकीस्वाराचे डोके पूर्णपणे लोखंडात अडकलेले. त्याचा श्वास बंद पडत होता. आम्ही पाच-सहा जणांनी मिळून एकाच वेळी दोन्ही हात घालून डोके हळूहळू बाहेर ओढले. रक्ताने हात भिजत होते, पण थांबलो नाही, असे मारणे यांनी सांगितले.
WKD25A09802, WKD25A09803, WKD25A09804
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.