पिंपरी-चिंचवड

मारुंजी अपघात प्रकरणी प्लॅन्ट मालकालाही अटक

CD

हिंजवडी, ता. २२ : शिंदेवस्ती-मारुंजी रस्त्यावरील अपघात प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मिक्सर चालकासह रेडिमिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लॅन्टच्या मालकालाही अटक केली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी (ता. २१) झालेल्या अपघात महाविद्यालयीन विद्यार्थिनी रिदा इम्रान खान हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर तिचा मित्र विवेक ठाकूर (वय २१, रा. हडपसर) गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विकास ताकतोडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चालक अजमल अन्सारी याने रस्त्याची परिस्थिती, इतर वाहने व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येईल याची कल्पना असूनही वाहन भरधाव आणि बेदरकारपणे चालवले. याबाबत नियंत्रण न ठेवल्याने आरएमसी प्लॅन्टचा मालक पांडुरंग घुले याला जबाबदार धरण्यात आले.
या अपघातानंतर परिसरातील नागरिक प्रचंड संतापले आहेत. मिक्सर दिवसभर राक्षसी वेगाने धावतात. या रस्त्यावर सतत होणारे अपघात आणि बेकायदा आरएमसी प्लॅन्टचा धोका कोण आणि केव्हा संपविणार, बेदरकार वाहनचालक आणि या मालकांचा मनमानी कारभार कधी थांबणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT