पारखी दांपत्य भाजपमधून निलंबित
माण गणात पक्षादेश न मानल्याचा फटका
हिंजवडी, ता. ३ : पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत संघटनात्मक शिस्तीचा कडक संदेश दिला आहे. पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या नवनाथ पारखी व त्यांच्या पत्नी युगंधरा पारखी या दांपत्यावर निलंबनाची थेट कारवाई करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बटणे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, भाजपने शिस्तभंगाविरोधात कठोर पाऊल उचलत नवनाथ पारखी व युगंधरा नवनाथ पारखी यांचे भारतीय जनता पक्षामधून निलंबन केल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक धोरणांशी विसंगत कृती केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमयानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबनानंतर संबंधितांनी पक्षाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात अथवा उपक्रमात सहभागी होऊ नये, असेही आदेशात नमूद आहे.
दरम्यान, नवनाथ पारखी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘शेखर वढणे हे जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर मी प्रदेशावर काम करीत आहे त्यामुळे त्यांना माझ्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.