हिंजवडी, ता. ५ : जिल्हा परिषदेच्या हिंजवडी-माण गटाची निवडणूक यंदा रंगतदार व तितकीच निर्णायक ठरणार आहे. कारण एकाच परिसरातून एकाच आडनावाचे आणि वेगवेगळ्या पक्षांचे तब्बल तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने हिंजवडीतील राजकीय गणित पूर्णतः ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडून एकट्या हिंजवडीतूनच साखरे नावाचे तीन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. साखरे नावाने तिहेरी लढत उभी राहिल्याने हिंजवडीतील पारंपरिक मतदार आता संभ्रमात सापडला आहे. साखरे नावाची ताकद तिन्ही दिशांना विखुरली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हिंजवडी परिसरात साखरे कुटुंबीयांचा सामाजिक व राजकीय प्रभाव मोठा आहे.
ग्रामपातळीवर पकड असलेली ही मतपेटी आजवर अनेक निवडणुकांत निर्णायक ठरली आहे. मात्र, यंदा हीच मतपेटी तीन भागांत विभागली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी थेट लढतीऐवजी बहुरंगी संघर्ष पाहायला मिळतोय. त्यामुळे साखरे मतांची फाटाफूट निर्णायक ठरणार असल्याची चर्चा परिसरात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, साखरे मतांचे विभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा प्रतिस्पर्धी पॅनेल किंवा दुसऱ्या मजबूत उमेदवाराला होऊ शकतो. विशेषतः ज्यांचे संघटन मजबूत आहे आणि प्रचार यंत्रणा आक्रमक आहे, असा उमेदवार या गोंधळात बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अखेरचा फैसला मतदारांच्या हाती
सध्या तरी हिंजवडीतील राजकीय चित्र धूसर आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कोण बाजी मारतो, कोणाची रणनीती यशस्वी ठरते आणि विभागलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाच्या पदरात पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हिंजवडीतील ही बहुरंगी लढत जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्वात चर्चेची आणि निकालाच्या दृष्टीने सर्वात अनिश्चित लढत ठरणार आहे, हे मात्र नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.