पिंपरी-चिंचवड

आम्हाला झोपू द्या म्हणताच त्यांनी...;काय झालं निगडीमध्ये पाहा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'आरडाओरडा करू नका, आम्हाला झोपायचे आहे', असे म्हटल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना निगडीतील ओटास्किम येथे घडली. 

सिराज वल्ली तांबोळी (रा. आझाद चौक, ओटास्किम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चेतन गायकवाड, मंथन गायकवाड, कृष्णा मस्के, नाना गायकवाड, नवा कांबळे, कुणाल, भैय्या, लखन मस्के, सोन्या कांबळे, भिमाबाई गायकवाड, राजू गायकवाड (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता. 23) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी यांचे दाजी रमजान तांबोळी यांच्या घरासमोर राहणारे कुणाल, भैय्या व त्यांचे इतर दोन मित्र मोठ्याने गोंधळ घालून आरडाओरडा करीत होते.

त्यावेळी तांबोळी त्यांना म्हणाले, "आरडाओरडा करू नका, आम्हाला झोपायचे आहे." यावरून चिडून आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्र अब्दुल मासुलदार, अमजद मोहिदिन शेख, शबाना शेख, रमजान तांबोळी यांना कोयता व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तसेच, यावेळी केलेल्या दगडफेकीत फिर्यादीच्या घरासमोरील रिक्षाचे नुकसान झाले. तर लखन बळीराम म्हस्के (रा. संग्रामनगर झोपडपट्टी, आझाद चौक, निगडी) यांनीही परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार शकिल ऊर्फ रमजान जलाल तांबोळी (वय 38), सिराज वल्ली तांबोळी (वय 20), अमजद मुद्दीन शेख (वय 20), अरबाज शेख (वय 20), सिराज शेख (वय 19), कासिमजाफर शेख (वय 30), अब्दुल अयुब मासुलदार (वय 24), शमीम शेख (वय 30), सद्दाम पटेल (वय 38, सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटस्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी (ता.23) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपींनी पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जमाव जमविला. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या घरात घुसून कोयता, लोखंडी पाईप व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच भिमाबाई गायकवाड व उमेश साठे यांच्या घरात घुसून घरातील वस्तूंचे नुकसान केले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT