पिंपरी-चिंचवड

दुचाकीस्वारानं पोलिसाला नेलं फरफटत; वाकडमधील घटना

वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी आहे.

पिंपरी : नाकबंदीच्या ठिकाणी दुचाकीस्वाराला थांबण्यास सांगितले असता, त्याने बंदोबस्तावरील पोलिसाला फरफटत नेले. ही घटना वाकड-हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे. (two-wheeler driver tote traffic police in wakad incident recorded in cctv footage)

संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. आढाले, मावळ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय ४७) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी आहे. याठिकाणी फिर्यादी हे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी कर्तव्य बजावत असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपीला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला.

चालकाने गाडी बाजूला घेतली; त्याला लायसन्स, कागदपत्रांची विचारणा केली असता, तो धक्का देऊन पळ काढू लागला. फिर्यादी यांचा हात गाडीच्या कॅरीअरमध्ये अडकला होता, तरीही आरोपीने फिर्यादी यांना ५० फूट फरफटत नेले. यामध्ये फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT