Mohammad Faisal Pathan sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad News : दोन दिवसावर वाढदिवस आलेल्या चिमुरड्याचा बादलीत पडून दुदैवी अंत

नुकताच रांगायला आणि पाऊले टाकायला शिकलेल्या तसेच दोन दिवसांवर पहिला वाढदिवस आलेल्या चिमुरड्याचा घरात खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी अंत झाला.

सकाळ वृत्तसेवा

नुकताच रांगायला आणि पाऊले टाकायला शिकलेल्या तसेच दोन दिवसांवर पहिला वाढदिवस आलेल्या चिमुरड्याचा घरात खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी अंत झाला.

वाकड - नुकताच रांगायला आणि पाऊले टाकायला शिकलेल्या तसेच दोन दिवसांवर पहिला वाढदिवस आलेल्या चिमुरड्याचा घरात खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी अंत झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना गुरुवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव येथील धनगर बाबा मंदीरा मागे समता कॉलनीत घडली. याबाबत वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोहंम्मद फैसल मोहंम्मदतारीक पठाण (वय ११ महिने) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, मूळचे उत्तर प्रदेशचे पठाण कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून समता कॉलनीत भाड्याच्या सिंगल खोलीत राहतात. गुरुवारी दुपारी जेवणानंतर मोहंम्मदचे आई-वडील झोपले असता मोहंम्मदची मात्र घरात धडपड सुरूच होती. त्याच्याकडे आईचे लक्ष असल्याने मोरीत गेलेल्या मोहंमदला त्यांनी दोन वेळा पुन्हा अंथरुणावर आणून झोपवले.

काही वेळ तो आईसोबत शांत झोपल्याने त्याच्या आईलाही डुलका लागला आणि घात झाला. मोहंमदला जाग आल्याने तो थेट मोरीत घुसला. पाणी भरलेल्या बादलीशी खेळता-खेळता तो बादलीत डोक्यावर उलटा पडला. नाका तोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरल्याने त्याचा करूण अंत झाला.

काही क्षणातच खडबडून जाग्या झालेल्या त्याच्या आईने समोरील चित्र पाहून हंबरडा फोडला. त्याला तात्काळ थेरगाव रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहंम्मदला एक तीन वर्षांचा मोठा भाऊ आहे. पठाण कुटुंबियांनी या दोघां भावांच्या मुंजेचा (खतना) सोमवारीच (ता. २७) मदरशात कार्यक्रम करून सर्वांना जेवण दिले होते. तर मयत मोहंम्मद याचा शनिवारी (ता. ४) पहिला वाढदिवस होता. गोरा गोमटा आणि सुंदर असलेला मोहंम्मद गल्लीत सर्वांचा लाडका होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT