Crime
Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

हत्यारासह व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

हातात तलवार, कोयते घेत व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे तिघांना महागात पडले आहे.

पिंपरी - हातात तलवार, कोयते घेत व्हिडीओ (Video) बनवून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) करणे तिघांना महागात पडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Police) गुंडा विरोधी पथकाने अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून सहा कोयते व दोन तलवार जप्त केल्या आहेत.

अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे (२१, रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली), ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर (१८, रा. माळवाडी, सोळू, खेड), अक्षय देविदास चव्हाण (२३, रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चिखली व आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर भाईगिरी करतानाचे व्हिडीओ गुंडा विरोधी पथकाला मिळाले. पोलिसांनी तातडीने तपास करुन तिघांनाही ताब्यात घेतले. खोजे याच्याकडून दोन कोयते व तलवार तर ठाकूर व चव्हाण यांच्याकडून चार कोयते व एक तलवार जप्त केली. या आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत चिखली व आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT