pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

युवक काँग्रेस च्या वतीने मोदींचा जन्मदिन राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

आंदोलनात मोठ्या संख्येने ‘बेरोजगार तरूणांचा सहभाग दिसून आला

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (ता.१७) केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकार विरोधात “मी बेराजगार कोण जबाबदार” हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ‘बेरोजगार तरूणांनी सहभाग घेत प्रतिकात्मक स्वरूपात हातगाडीवर केळी व नारळ विक्री करत तीव्र भावना व्यक्त केल्या.

पुणे जिल्हा इंटक चे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम ईनामदार, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस रवी नांगरे, अलोक लाड, अर्णव कामठे, योगेश नायडू, गणेश नांगरे, अनिल सोनकांबळे, एकनाथ मुंढे, प्रकाश पठारे, असिफ शेख, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे, सोहेल मुलाणी, अजय काटे, प्रथमेश वाघमारे, शिवा पल्लेडवाड, विक्रम कुसाळकर, सुमित मंडल, रोहन मडिकर आदींनी सहभाग घेतला.

इंटकचे अध्यक्ष कदम म्हणाले “या केंद्रातील सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यापैकी एक मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी आहे. त्यामुळे कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. युवक आज हवालदिल होऊन बेजार झाला आहे. कामगार कायदे अन्यायकारक पणे लादले जात आहेत. त्यामुळे कामगारवर्ग असुरक्षित झाला आहे. ’’

युवक काँग्रेसचे शहराध्यक्षबनसोडे म्हणाले, ‘‘आज प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरूणास मी बेरोजगार, याला कोण जबाबदार ? असा प्रश्न भेडसावत आहे. बेरोजगारीमुळे देशातील युवक हा गुन्हेगारीकडे वळत आहे. आज पंतप्रधान मोदींजीचा वाढदिवस आहे. त्यांना या विषयी चे गांभीर्य अधिक तीव्रतेने कळावे यासाठी देशव्यापी स्वरूपात हे आंदोलन युवक काँग्रेसच्या माध्यमातून करून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT