Dashant Pardeshi
Dashant Pardeshi Sakal
पिंपरी-चिंचवड

तळेगावात तरुणाचा डोक्यात घाव घालून खुन

सकाळ वृत्तसेवा

सतरा वर्षीय मुलाचा धारदार शस्त्राने डोक्यात घाव घालून खुन केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली.

तळेगाव स्टेशन - सतरा वर्षीय मुलाचा धारदार शस्त्राने डोक्यात घाव घालून खुन (Murder) केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. (youth murder in talegaon crime)

दशांत अनिल परदेशी (१७, भोईआळी, रविवार पेठ, तळेगाव दाभाडे) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव असून,याप्रकरणी त्याचे वडील अनिल भागीरथ परदेशी (५२, भोईआळी, रविवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दशांत हा सायंकाळनंतर गावात फिरावयास गेला तो उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा फोन स्वीच ऑफ लागत असल्याने काळजीपोटी वडीलांनी रात्री साडेदहाला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी शोध घेतला.

बेपत्ता तरुणाचे चुलते सुनिल परदेशी यांनी शोध घेतला असता गावतळया लगतच्या नॅशनल हेवी कंपनीकडे जाणा-या रस्त्यालगत दशांत वापरत असलेली स्प्लेंडर दुचाकी मिळून आली.त्यापासून काही अंतरावर मोकळया मैदानामध्ये दशांतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यास आणि कवटीला आघात झाल्यासारखी जखम होती. मोबाईल व गाडीची चावी मात्र घटनास्थळी दिसुन आली नाही.

याप्रकरणी पोलीसांनी सात ते आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT