Aamir Khan Want Quit Bollywood Esakal
Premier

Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्ट बॉलिवूड सोडणार? रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिरचं धक्कादायक उत्तर, पहा Video

Aamir Khan Interview: शो 'चॅप्टर 2' चा एक नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये आमिर खान अभिनेत्रीला अशा अनेक गोष्टी सांगताना दिसला, ज्या त्याने याआधी क्वचितच सांगितल्या असतील.

आशुतोष मसगौंडे

Aamir Khan Interview Rhea Chakraborty Podcast Chapter 2

मुंबई : रिया चक्रवर्ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, पण तिने प्रेक्षकांशी कनेक्ट राहण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. अभिनेत्रीने नुकतेच स्वतःचे पॉडकास्ट सुरू केले आहे, ज्याची पहिली पाहुणी सुष्मिता सेन होती.

आता रिया चक्रवर्तीच्या शोचा दुसरा पाहुणा म्हणून आमिर खान आहे. अलीकडेच रिया चक्रवर्तीने तिच्या नुकत्याच लाँच झालेल्या शो 'चॅप्टर 2' चा एक नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये आमिर खान अभिनेत्रीला अशा अनेक गोष्टी सांगताना दिसला, ज्या त्याने याआधी क्वचितच सांगितल्या असतील.

'चित्रपटांपासून दूर जायचे आहे'

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या पॉडकास्ट 'चॅप्टर 2' च्या आगामी एपिसोडचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.

या प्रोमोमध्ये आमिर खान अभिनेत्रीच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आल्याचे दाखवण्यात आले आहे. शोदरम्यान आमिरने अनेक गोष्टींबद्दल सांगितले.

यावेळी, जेव्हा अभिनेत्याच्या स्टारडमबद्दल चर्चा झाली तेव्हा आमिर म्हणाला, 'मला आता चित्रपटांपासून दूर जायचे आहे.'

अमिरचे हे उत्तर रिया चक्रवर्तीसाठीही धक्कादायक होते. यावर रिया अमिरला म्हणाली, 'तुम्ही खोटं बोलत आहात.' यावर आमिर म्हणाला, 'नाही, मी खरं बोलतोय.'

'मोठा धक्का बसला'

रिया चक्रवर्तीसोबत आपल्या अनेक गोष्टी शेअर करताना आमिर खान भावूक झाला. त्याने काही हावभावांमध्ये सांगितले की, त्याने मोठ्या मेहनतीने बनवलेला 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला.

आमिर पुढे म्हणाला की, 'लाल सिंग चड्ढा नंतर मला आणखी एका चित्रपटाचे शूटिंग करायचा होते पण मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.'

आमिर खाननेही शोमध्ये रियाच्या पॅशनचे कौतुक केले. तो म्हणाला, "रिया, तू कमालीचे धैर्य दाखवले आहेस."

मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमिर खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आमिर खान शेवटचा लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. यानंतर त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT