Anil Kapoor Esakal
Premier

फक्त अभिनयच नाही तर या कलेतही निपुण ! बॉलिवूडमधील 'हा' अभिनेता आहे गायकही

Bollywood actor who is singer : बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते हे एक उत्तम गायकही आहेत. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत जे फक्त अभिनयचं नाही तर इतरही कलांमध्ये आघाडीवर आहेत. बॉलिवूडमध्ये 'झक्कास' अभिनेता अनिल कपूर हे ही फक्त अभिनयच नाही तर इतर कलेमध्येही पारंगत आहे. जाणून घेऊया त्यांच्या कलेविषयी.

शास्त्रीय संगीताचं घेतलंय शिक्षण

अभिनेता अनिल कपूर यांनी सेमी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी काही सिनेमांसाठी गाणीही गायली आहे. 'वो ७ दिन' १९८३ साली रिलीज झालेल्या या सिनेमासाठी त्यांनी 'प्यार किया नहीं जाता' हे गाणं गायलं होतं तर २००० साली रिलीज झालेल्या 'हमारा दिल आपके पास है' या सिनेमासाठी त्यांनी 'आय लव्ह यु' हे गाणं गायलं होतं. पण अभिनेत्याने बऱ्याचदा अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं कि, त्यांना गाणं गाताना खूप भीती वाटतेय. ह

मिस्टर इंडियासाठी केली नव्हती निवड

तुम्हाला माहितीये का ? मिस्टर इंडिया सिनेमातील अरुण वर्मा या भूमिकेसाठी अनिल कपूर यांची निवड झाली नव्हती. मुळात हा रोल अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिला होता. पण त्यांच्या स्वतःच्या इमेजमुळे त्यांनी हा सिनेमा नाकारला. मग दिग्दर्शक शेखर कपूर यांनी राजेश खन्ना यांना विचारलं पण त्यांनीही नकार दिला. हा सिनेमा खूप प्रयोगशील आहे म्हणून त्यांनी हा नकार दिला. मग शेवटी अनिल कपूर यांची या सिनेमासाठी निवड झाली आणि आता हा सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे.

बॉलिवूडमधून नाही तर प्रादेशिक सिनेमातून केलं पदार्पण

अनिल यांनी बॉलिवूडमधून नाही तर एका तेलुगू सिनेमातून पदार्पण केलं. वामसा वृक्षम या १९८० साली रिलीज झालेल्या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं होत. त्यानंतर त्यांना बॉलिवूडमधून ऑफर येऊ लागल्या. 'वो सात दिन' या सिनेमातून त्यांना मुख्य भूमिका मिळाली. या सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली.

अनिल आता 'बिग बॉस ओटीटी सीजन ३' चं सूत्रसंचालन करत आहेत. सध्या हा शो चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT