Kartik Aaryan with mother Esakal
Premier

Kartik Aaryan : आणि आईने कार्तिकला सॅन्डलने मारलं ; कार्तिकच्या आईने सांगितली 'ती' आठवण

Kartik Aaryan mother shared his childhood memory : अभिनेता कार्तिक आर्यन आणि त्याच्या आईने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्या आईने त्याची लहानपणीची आठवण शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan : चंदू चॅम्पियन (Chandu Champion) सिनेमामुळे अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या सगळीकडे चर्चेत आहे. कार्तिकच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय आणि त्याचा सिनेमाही बॉक्स ऑफिस गाजवतोय. नुकतंच कार्तिकने द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) मध्ये त्याची आई डॉ. माला तिवारी यांच्या बरोबर हजेरी लावली. यावेळी कार्तिकीच्या आईने कार्तिकची लहानपणीची आठवण शेअर केली.

आईने सँडलने झोपडलं

कपिल शर्माने कार्तिकच्या आईला तुम्ही कार्तिकवर कधी नजर ठेवलीये का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी होकार दिला. त्या म्हणाल्या,"कार्तिक लहान असताना त्याचा अभ्यास मीच घ्यायचे. मी खूप कडक शिस्तीची होते. कार्तिक बारावीला होता आणि त्यावेळी त्याला क्लासेस लावले होते आणि मी त्याच्या सरांना सांगून ठेवलं होतं कि हा आला नाही तर मला लगेच फोन करा. तर मला दोन-तीनदा तसा फोन आला होता आणि त्यानंतर एके दिवशी तो क्लासला जायला निघाला तर मी त्याचा पाठलाग करायला लागले. त्याला माहित नव्हतं मी त्याचा पाठलाग करतेय नंतर मी पाहिलं हा क्लासच्या दिशेने न जाता दुसऱ्याच दिशेला वळला आणि मी त्याच्या मागे गेले तेव्हा मला दिसलं कि, हा एका चक्कीच्या मागे गेला. तिथे एक मोठी स्क्रीन लावली होती आणि सगळी मुलं तिथे बसून गेम खेळत होती. मी त्याला पकडलं आणि घरी घेऊन आले. घरी आल्यावर मला इतका राग आलेला आणि काहीच सुचत नव्हतं. मी माझ्या पायातील सँडल काढली आणि त्यानेच त्याला मारलं. त्या दिवशी त्याने खूप मार खाल्ला." अशी आठवण त्याच्या आईने सांगितली. आईने केलेल्या या पोलखोलमुळे कार्तिक खूप लाजला.

त्यांनी यावेळी कार्तिकच्या बऱ्याच लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांना कार्तिकने इंजिनिअर व्हावं असं वाटत होत असंही सांगितलं. कार्तिकने जे काही आता यश मिळवलंय त्याबद्दल त्या खूप समाधानी आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या. कार्तिकच्या आई-वडिलांचंही शोमध्ये खूप कौतुक झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT