Premier

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

सकाळ डिजिटल टीम

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी फनी तर कधी इमोशनल पोस्ट तो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच कुशलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कुशलने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणतो,"सुरवातीच्या काळात मी ट्रेन ने भरपूर प्रवास केला, तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेन मधे भजनात रमणारे दर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली .

काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली. “बकासुरा सारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेंव्हा मनात यायचे.

आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला; ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत रहायचं.

आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्या सारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात, सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो !! :- सुकून."

आयुष्याच्या प्रवासात होणारी घालमेल, माणसांचं सोडून जाणं, पुन्हा नव्याने सुरुवात करून प्रवास सुरु ठेवणं हे कलाकारांचं जगणं कुशलने या पोस्टमध्ये मांडलं आहे. कुशलने कोणत्या कारणामुळे अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे ते मात्र अजून समजू शकलं नाही.

त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं. "कुशल खरंच खूप सुंदर विवेचन करतोस. तू ज्या प्रकारे लोकल ट्रेनचा आपल्या जीवनातल्या घटनांशी/भावनांशी मेळ घातला आहेस, तो खरच खुप सुरेख आहे. मुंबईत राहणाऱ्या व लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनी नक्कीच आपआपल्या जीवनात तो अनुभवला आहे.." अशी कमेंट एका युजरने केली. तर एकाने "एक कलाकार कधीच स्वतःला बदलत नाही. बदलतात त्या त्याच्या भूमिका आणि जागा.... यात आपल्या सोबत कोण आणि किती वेळ असणार हा सुद्धा एक प्रश्नच असतो. कारण एकत्र प्रवास करताना कोण किती आपला होऊन जातो. हे तो आपल्या पासुन लांब गेल्यावर समजते. पण असो असे चालायचेच कारण प्रत्येकाला आपला प्रवास सुखाचा हवा....." असं म्हणत कुशलच्या लिखाणाला दुजोरा दिला.

People post comments on Kushal's post

'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीवरील कार्यक्रम संपल्यानंतर कुशल सध्या सोनी हिंदी टेलिव्हिजनवरील मॅडनेस मचायेंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'द कपिल शर्मा' शो संपल्यानंतर त्याच्या जागी हा नवीन शो सुरु झाला असून या शोमध्ये अनेक कलाकार विविध विषयांवरील कॉमेडी स्किट्स सादर करतात. अभिनेत्री हुमा कुरेशी या कार्यक्रमाचं परीक्षण करते. अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता गौरव मोरेसुद्धा या कार्यक्रमात काम करतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

Arvind Kejriwal: 'ब्रश सोबत घ्यायला विसरू नका..'; केजरीवालांच्या तुरुंगात जाण्यावर 'बाबू भैय्या'ने केला हल्लाबोल

Cooking Tips: कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स, सर्वजण खातील आवडीने

Venkatesh Iyer: शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर अडकला चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT