Ranbir Kapoor in Ramayan Esakal
Premier

Ranbir Kapoor : रणबीरच्या रामायण सिनेमाबाबत महत्त्वाची अपडेट ! 'या' ही सिनेमाचं शूटिंग करणार सुरु

Ranbir Kapoor starts shooting of this big budget movie along with Ramayana : अभिनेता रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' या सिनेमाची चर्चा गेला बराच काळ रंगली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. न्यूज 18 ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाचं वर्किंग टायटलसुद्धा रिव्हील झालं आहे.

या रिपोर्टनुसार रामायण सिनेमाचं शूटिंग सिनेमाच्या टीमने ठरवलेल्या शेड्युलपेक्षा अधिक वेळ पुढे जाणार असल्याचं म्हंटलं जातंय. म्हणूनच, रणबीर त्याच्या आगामी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित लव्ह अँड वॉर सिनेमाचं शूटींग ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुरु करणार आहे.

न्यूज 18च्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "रणबीर रामायण सिनेमाचं शूटिंग सुरु ठेवणार असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तो लव्ह अँड वॉर सिनेमाच्या तयारीला सुरुवात करेल. तर आलियासुद्धा वायआरएफच्या आगामी स्पाय थ्रिलर सिनेमात शर्वरी वाघसोबत काम करणार आहे. ती ही या काळात त्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असेल. या काळात रणबीर भन्साळी यांच्यासोबत सिनेमाच्या स्क्रिप्टचं वाचन आणि तयारीला सुरुवात करेल. रामायण ट्रायोलॉजीच्या पहिल्या भागाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच लव्ह अँड वॉर सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर मध्ये सुरु होऊ शकत. मुंबईमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार असून अजून सेटचं काम पूर्ण झालं नाहीये." दरम्यान रामायण सिनेमाच्या पहिल्या भागाचं वर्किंग टायटल गॉड पॉवर असं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गाण्यांसंदर्भात भन्साळी प्रॉडक्शन डिझाईन टीमशी चर्चा करत आहेत. विकी कौशल या सिनेमाचं शूटिंग कधी सुरु करणार? त्याचा सिनेमातील रोल कसा असेल याबाबत अजून माहिती मिळू शकली नाहीये.

सेटवरील फोटो लीक झाल्यानंतर निर्मात्यांचा मोठा निर्णय

मध्यंतरी रामायण सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो लीक झाल्यानंतर सिनेमाच्या टीमने सेटवर सगळ्या बाजूने पडदे लावले आहेत. तसेच सेटवरील लोकांना फोन घेऊन येण्यास बंदी केली आहे. सिनेमासंदर्भातील कोणतीही बातमी लीक होऊ नये याची पुरेपूर काळजी सिनेमाची टीम घेतेय.

रामायण सिनेमात रणबीरसोबत साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. तर लारा दत्ता कैकेयी, सनी देओल हनुमान, आदिनाथ कोठारे भरत आणि शिबा चढ्ढा मंथरेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT