Shashank Ketkar Esakal
Premier

Shashank Ketkar Video : "मीरा रोड ठाण्यामध्ये लोणावळ्याचा फील..." ; तासभर ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर शशांक केतकरचा संतप्त व्हिडिओ, म्हणाला..

Shashank Ketkar expressed his anger on traffic jam between Thane to Mira road : अभिनेता शशांक केतकर तासभर ट्रॅफिक जाममध्ये अडकला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याने नाराजी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. फक्त त्याचं वैयक्तिक आयुष्यच नाही तर सामाजिक मुद्द्यांवरही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट चर्चेत असतात.

ठाणे ते मीरा रोड या दरम्यान होणारं ट्रॅफिक ही नेहमीची समस्या बनली आहे. याचा त्रास अनेकांना भोगावा लागतो. नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शशांकने यावर भाष्य केलं. शशांक या ट्रॅफिकमध्ये जवळपास तासभर अडकला असून याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याचा संताप त्याने व्यक्त केला.

शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ठाणे ते मीरा रोड दरम्यान झालेल्या ट्रॅफिकचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सगळ्या गाड्या एकाच जागी थांबलेल्या पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये शशांकने उपहासात्मक पद्धतीने त्याचा संताप व्यक्त केला. तो म्हणाला,"वाव, मीरा रोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील देण्यासाठी ही एक योजना आखली आहे. खरंतर आपल्याला कारण कळत नाही. सिग्नल चांगले लावून सिग्नलचे खर्च वाढवण्यापेक्षा रस्त्यात खड्डे, चुकीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आणि बेशिस्तपणा यामुळे सिग्नलचं एक वेगळं काम आपल्याचकडून केलं जातंय ही वेगळी दृष्टी आपल्याच देशाकडे आहे. मला फार बरं वाटतंय सिग्नलचा हा खर्च वाचतो, खड्ड्यांमुळे स्पीड ब्रेकर्सचा खर्च वाचतो. केवढी वेगळी दृष्टी लागते या सगळ्याला. लोकांचा वेळ, जीव तसही भारतात फार महत्त्वाचं नाहीये. आता लोकांनी गाड्यातून उतरून चालत जाण्याचा निर्णय घेतलाय. मी पण आता गाडी इथेच पार्क करून चालत सेटवर जाण्याचा विचार करतोय. रात्री ९-१० पर्यंत या गाड्या हलतील असं मला काही वाटत नाही. क्या बात है!"

"खड्डे आणि indiscipline, so true.... किती किती गोष्टींचा त्रास करुन घ्यायचा नाही, असं स्वतःला समजवायचं? देवा" असं कॅप्शन शशांकने या व्हिडिओला दिल असून त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

या आधीही शशांकने फिल्मसिटीच्या बाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत संतापजनक पोस्ट शेअर केली होती. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT