Aditi Dravid Esakal
Premier

Aditi Dravid : "शूटिंग वाढलं, सेट रिकामा आणि..."; त्या क्षणी अदितीने घेतला मुंबईत घर घेण्याचा निर्णय

अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत घर घेण्यामागची घटना पोस्टच्या माध्यमातून शेअर केली. काय म्हणाली अदिती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काहीच दिवसांपूर्वी मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने तिच्या घराची झलक शेअर केली. नुकतीच तिने आणखी एक पोस्ट शेअर करत मुंबईत तिने घर का घेतलं याच कारण स्पष्ट केलंय.

अदितीची पोस्ट

सोशल मीडियावर अदितीने एक पोस्ट शेअर केलीये. त्यात ती म्हणते,"२०१५ ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंट नी,रुम वर ,शेयरिंग मधे,roommates सोबत,सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता! २०१९ मधे एक शॉर्टफिल्म शूट करत होते. Covid चा काळ असल्याने तेव्हा रेंट च घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकप होताना समजलं की अजून एक दिवस शूट वाढलं आहे! अणि कोणतीही alternative सोय करायचा आत दिग्दर्शक "PACKUP” म्हणले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला set, पूर्ण रिकामा झाला! बरीच रात्र झाली होती,काय करावं काही सुचेना! मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचण कळताचक्षणी ती मला तिचा घरी घेऊन गेली! सौमित्र, रेवती I will forever be grateful to you guys!
पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं! त्यानंतर ४ वर्ष गेली,कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादानी आज Finally हे धडतयं! Still can’t believe it’s true! Thankful for everyone who stood by me in this journey! रुपाली निंबाळकर, अभिराज निंबाळकर, स्वप्ना, ओंकार आणि गायत्री तुम्हाला विशेष thankyou!
खरं म्हणतात, मुंबई सपनों का शेहेर हैं! And iam Falling in love with her all over again!"

तिने केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक केलं. अनेकांनी तिचं नवीन घर घेतल्याबद्दल अभिनंदनही केलं. अदितीने काही दिवसांपूर्वी गृह्प्रवेशाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले. त्यात तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली.

तर अदितीने नव्या घरासाठी तिच्या आजीच्या तरुणपणीचं कपाट दुरुस्त करून वापरायला घेतलं. सोशल मीडियावर तिने ही प्रोसेस शेअर केली होती.

पहा व्हिडीओ:

अदिती लवकरच फुलवंती या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येतेय. प्राजक्ताने या सिनेमाची निर्मिती केली असून स्नेहल तरडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT