Dalljeet Kaur  Esakal
Premier

Dalljeit Kaur : "नवऱ्याच्या मते आमचं लग्नच झालं नाहीये" ; दलजितची डिलीटेड पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्रीने एसएनला विचारला जाब

अभिनेत्री दलजित कौरने पोस्टच्या माध्यमातून तिच्या नवऱ्याला जाब विचारला आणि नंतर ती पोस्ट डिलीट केली. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल झालीये.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच दलजितने केनियास्थित बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरा विवाह केला. लग्नानंतर दहा महिन्यातच दलजित भारतात परत आली. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच दलजितने निखिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केलाय. सोशल मीडियावर तिची या संदर्भातील पोस्ट व्हायरल झालीये.

पोस्ट सोशल मीडियावरून केली डिलीट

दलजितने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली पण काही वेळाने तिने ती डिलीट केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिची ही डिलीट केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

दलजितने तिच्या पोस्टमध्ये म्हंटल कि,"माझे कपडे, माझा चुडा, माझं मंदिर, माझं प्रत्येक सामान तिथे आहे, माझं घर तिथे आहे... माझ्या मुलाचे कपडे, पुस्तकं आणि त्याच्या वडिलांकडून असलेली अपेक्षा सगळं तिथे आहे, माझं सासर, माझ्या हाताने मी त्या घराच्या भिंतीवर बनवलेली पेंटिंग सगळं तिथे आहे. तिथेच आहे. माझे पती मला सांगतात कि ते माझं घर नाहीये. आमचं लग्न कधी झालंच नव्हतं. एसएन मला सांगा तुमचं यावर काय मत आहे? निखिल खरंच माझा नवरा आहे का? का तुमच्याही मते अजून आमचं लग्नच झालेलं नाहीये?"

Dalljeet Kaur

एस एन ला प्रश्न आणि नवऱ्याला विचारला जाब

निखिलच्या आयुष्यात एस एन नावाची कोणतीतरी मुलगी असल्याचा आरोप दलजितने केला आहे. या आधी दलजितने पोस्ट तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड केलं होत. तिने तिचा नववधूच्या लूकमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन दलजीतनं तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "ती तिच्या मुलांच्या फायद्यासाठी मौन धरते. तिच्या कुटुंबासाठी ती सर्वकाही करत असते. एसएन, तुलाही मूल आहे का?" असा प्रश्न तिने विचारला होता.

इतकंच नाही तर तिच्या नवऱ्याने शेअर केलेली पोस्टचे स्क्रिनशॉट शेअर करत नवऱ्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली,"तू आता निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर दिसत आहेस. तुझी पत्नी आणि मुलगा लग्नाच्या 10 महिन्यांनंतर भारतात परतले, संपूर्ण कुटुंबाचा अपमान झाला. तू मुलांसाठी थोडी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती.” दलजीतने पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, “किमान तू सार्वजनिक ठिकाणी तुझ्या पत्नीला थोडा सन्मान द्यायला हवा होतास कारण मी इतर अनेक गोष्टींबद्दलही गप्प राहिले होते."

२०२३ च्या सुरुवातीला दलजीतने निखिल पटेलही लग्न केलं. त्यांचं अरेंज मॅरेज होतं. या आधी तिचं लग्न शालीन भानोतशी झालं होतं पण काही कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. शालीन आणि दलजीतला जेडन नावाचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT