Dalljiet Kaur & Nikhil Patel Esakal
Premier

Dalljiet Kaur & Nikhil Patel : एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर दलजितच्या नवऱ्यानं सोडलं मौन; म्हणाला, "ती मर्यादा..."

दलजित कौर सोबत होणाऱ्या घटस्फोटाबाबत निखिल पटेलने स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजित आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या नात्यात दुरावा आला असून नवऱ्याचे एका स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप दलजितने केला आहे.

इतकंच नाही तर तिचा नवरा त्यांचं लग्न झालं होतं हे मान्य करायला तयार नसून त्या संदर्भातील काही स्क्रीनशॉट्स तिने सोशल मीडियावर शेअर केले. याबाबतीतील तिच्या पोस्ट चर्चेत असतानाच अखेर तिचा नवरा निखिल पटेलने अखेर या प्रकरणावर वक्तव्य केलं.

निखिलने सोडलं मौन

इटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निखिल त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर व्यक्त झाला. तो म्हणाला,"दलजितने तिचा मुलगा जेडनबरोबर या वर्षी जानेवारीमध्ये केनिया सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अखेर आम्ही वेगळे झालो. आम्हा दोघांना लक्षात आलं की आमच्या कुटुंबाचा पाया आम्हाला जितका वाटत होता तितका मजबूत नाही. दलजितला केनियामध्ये जमवून घेणं कठीण गेलं. मार्च २०२३ मध्ये आम्ही मुंबईत भारतीय पद्धतीने लग्न केलं होतं. तो एक सांस्कृतिक सोहळा होता पण त्याला कायदेशीर बंधन नव्हतं. या लग्नाचा उद्देश दलजीतच्या कुटुंबाला तिच्या केनियाला शिफ्ट होण्याबद्दल धीर देण्यासाठी होता. "

ती सोडून गेल्यामुळे आमचं नातं संपलं -निखिल

"आम्ही प्रयत्न केले, पण करिअर आणि भारतातील आयुष्य सोडून दलजीतला केनियात जुळवून घेता आलं नाही. परिणामी नात्यातील गुंतागुंत वाढत गेली.सांस्कृतिक संघर्ष, भिन्न मूल्ये यामुळे आमच्यासाठी हे आव्हानात्मक ठरले. आणि आमचं नातं परिपक्व झाल्यानंतर हे घडलं. दलजितने मला, तिच्या मुलाच्या शाळेत आणि इतरांना कळवले ज्या दिवशी केनिया सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती पुन्हा कधीच केनियात परत येणार नाही असं तिने सांगितलं. तिच्या निघून जाण्यामुळे आमचं नातं संपलं. तसेच गेल्या पाच महिन्यांतील तिच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे. " असं निखिल म्हणाला.

"दलजीतने नुकत्याच सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत, त्यामुळे मी गोंधळलो आहे आणि मला त्रास झाला आहे. तिने माझ्या आयुष्यात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण आता तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिच्या पोस्ट आणि तिच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, तिच्या पोस्टमुळे कुटुंबियांना व मित्रांना नाहक त्रास होतोय, त्यामुळे ती असं वागणं थांबवेल, अशी मी आशा करतो" असं म्हणत त्याने नातं संपवण्याची जबाबदारी तिच्यावर टाकलीय.

काय घडलं नेमकं?

निखिलने एसएन अशी अक्षरं लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर करत दलजितने तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला. इतकंच नाही तर तिच्या नवऱ्याला त्यांचं लग्न मान्य नाही त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटूंबाला त्रास होतोय असं तिने म्हंटलं. तिच्या या पोस्टमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT