komal new house  esakal
Premier

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील अभिनेत्रीने घेतलं नवं घर; गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली- जेव्हा स्वप्न...

Premachi Gosht Actress New House: लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' मधील अभिनेत्रीने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Payal Naik

गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं. अनेकांनी या घरात गृहप्रवेश करत त्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. भूषण प्रधान, रुचिरा जाधव, चेतन वडनेरे, रोहित माने, धनश्री काडगांवकर, प्रसाद ओक यांसारख्या अनेक कलाकारांनी स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. आता आणखी एका अभिनेत्रीचं स्वतःचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची' गोष्ट ही घराघरात पाहिली जाते. याच मालिकेतील एका अभिनेत्रीने आपलं नवं घर खरेदी केलं आहे. तिने नुकताच या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. त्याचे फ़ोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील 'स्वाती' म्हणजेच अभिनेत्री कोमल गजमल हिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोमलने नुकताच नवीन घर खरेदी केलं आहे आणि या घरात तिने पतीसोबत गृहप्रवेशही केला आहे. या विधीचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीने नव्या घरात गृहप्रवेश केला. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'जेव्हा स्वप्नपूर्ती होते, शुभ दसरा.' कोमलच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांसोबतच तिचे सहकलाकार तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर, राज हंचनाळे यांनीही तिच्या फोटोंवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोमल ही मालिकेत राज हंचनाळे म्हणजेच सागरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसतेय. तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. ही मालिका सुरू झाल्यापासून टॉप ३ मध्ये असते. आता नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी] अभिनेत्रीच्या नव्या घराच्या फोटोंवर कमेंट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT