Sonakshi & Zaheer Esakal
Premier

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal : सात वर्षं डेटिंग आणि मग लग्न, सोनाक्षीने 'ते' फोटो शेयर करत लिहीलं "हे सगळं दैवी..."

Sonakshi Sinha Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे रोमँटिक फोटोज पोस्ट केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha Wedding : यावर्षीचं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं लग्न असेल तर ते अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इकबाल (Zaheer Iqbal) या दोघांचं लग्न चांगलच चर्चेत आलं. सोशल मिडीयावर तर त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि जहीर (Zaheer Iqbal) यांनी तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केलं त्यानंतर यावर्षी लगीनगाठ बांधली. २३ जून रोजी दोघांनी साखरपुडा केला आणि मग रजिस्टर लग्न केलं. दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले होते आणि त्यावर लाईक्सचा वर्षाव  झाला. नुकतच सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि जहीर (Zaheer Iqbal) यांनी सोशल मिडीयावर त्यांचे रोमँटिक फोटो शेयर केले आहेत.

लग्नानंतर दोघांनी खास रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. लग्नासाठी सोनाक्षीने (Sonakshi Sinha) लाल रंगाची साडी नेसली होती तर जहीरने (Zaheer Iqbal) पांढऱ्या रंगाची शेरवानी होती. याच खास पेहरावात दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलय. या फोटोशूटमध्ये दोघही एकमेकांसोबत लग्न केल्यानंतर किती आनंदी आहेत हे दिसतय. 

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इकबाल (Zaheer Iqbal) यांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो शेयर करत त्यांच्या नात्याविषयी खास मेसेजही पोस्टमध्ये लिहीलाय. सोनाक्षीला हा जूण दैवी अनुभव वाटत असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय. या पोस्टमध्ये ते लिहीतात की, "काय दिवस होता, आमचे सगळे मित्रमंडळी आणि परिवाराकडून प्रचंड प्रेम मिळालं, खूप मजा केली. सगळे एकत्र मजा करत होते. सगळ्यांनी आम्हाला सहाय्य केलं.असं वाटलं की एकमेकांच्या प्रेमात असलेल्या दोघांना एकत्र आणण्यासाठी पूर्ण ब्रम्हांड एकत्र आलाय. हा एक दैवी हस्तक्षेप नाही तर काय आहे. आम्ही एकमेकांची सोबत मिळाल्याने आणि खूप प्रेम मिळाल्याने धन्य झालोय."

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इकबालच्या (Zaheer Iqbal) रिलेशनशिपला २३ जून २०१७ रोजी सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच ही तारीख लक्षात ठेवून त्यांनी लग्नासाठी हीच तारीख निवडली. २३ जून रोजी रजिस्टर लग्न करून त्याच दिवशी रात्री रात्री थाटात रिसेप्शन सोहळा पार पडला. या रिसेप्शन सोहळ्यात बॉलीवुडमधील अनेक नामवंत कलाकार मंडळी सहभागी झाली होती. सलमान खान, रेखा, रवीना टंडण, काजोल, संगीता बिजलानी, अनिल कपूर, चंकी पांडे अशा अनेक कलाकारांची हजेरी यावेळी पाहायला मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका होणार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात वास्तव्य करणार

Loan Relief for Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, कर्जमुक्‍तीसाठी पाच हजार कोटी; लाभ वितरण कार्यक्रमात शिंदेंच्या अनुपस्थितीची चर्चा

Farmer Loan Waiver Crises: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले; उमरखेड तालुक्यातील अंबाळी येथील घटना; सततची नापिकी, कर्जाचा डोंगर

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीमध्ये रीलसाठी गोळीबार, तरुण गंभीर जखमी

Eknath Shinde meets PM Modi: उपमुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांसह घेतली PM मोदींची भेट, काय झाली चर्चा?

SCROLL FOR NEXT