Gharoghari matichya chuli new twist 
Premier

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

New twist in Gharoghari Matichya Chuli serial : स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत ऐश्वर्याने सौमित्रला किडनॅप केलं आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. जानकी रणदिवे आणि तिच्या कुटूंबाची गोष्ट सांगणारी ही नुकतीच सुरु झालेली मालिका पहिल्या एपिसोडपासूनच चर्चेत आहे. नुकताच स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया हॅण्डलवर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आणि या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सौमित्रने ऐनवेळेस ऐश्वर्याशी त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आणि तो अवंतिकासोबत पळून गेला. त्यामुळे दुखावलेल्या ऐश्वर्याने जानकीला धडा शिकवण्यासाठी सारंगशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं या मालिकेत दाखवण्यात आलं. आता मालिकेत सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांची झलक पाहायला मिळतेय. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ऐश्वर्याचं कारस्थान जानकीला समजणार आहे.

मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं कि, सारंगचा हळदी समारंभ सुरु असताना ऐश्वर्या हळद घेऊन एका खोलीत जाते. तिने तिथे सौमित्रला बांधून ठेवलेलं असतं आणि ती सौमित्रला हळद लावते आणि त्याच्या गालावर लागलेली हळद स्वतःला लावण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच जानकीला रस्त्यात हळद सांडलेली दिसते. ती त्या खुणांचा शोध घेत ऐश्वर्याने सौमित्रला लपवून ठेवलेल्या खोलीपर्यंत पोहोचते आणि तिला कसलातरी संशय येतो.

पहा प्रोमो:

मालिकेच्या या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत ऐश्वर्याचं हे कारस्थान उघडं पडावं अशी इच्छा व्यक्त केलीये. तर अनेकांनी मालिकेच्या या प्रोमोवर टीकाही केलीये. मालिकेच्या नावानुसार ही मालिका नाहीये असं अनेकांनी म्हंटलं आहे. तर काहींनी ऐश्वर्या-सारंगपेक्षा ऐश्वर्या आणि सौमित्रची जोडी चांगली दिसतेय असं म्हंटलं आहे.

आता ऐश्वर्याचं हे कारस्थान जानकीला समजणार का? जानकी सौमित्रची सुटका करू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या या विशेष महाएपिसोडमध्ये मिळतील. गुरुवारी २ मे ला मालिकेचा हा विशेष भाग संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT