Amruta Khanvilkar sakal
Premier

Amruta Khanvilkar: "एक बार देख लीजिए..."; मुंबई पोलिसांची हटके पोस्ट, अमृता खानविलकर म्हणाली, "उफ्फ ये अदाये"

Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर हिरामंडी या वेब सीरिजमधील डायलॉग शेअर करुन नागरिकांना एक खास संदेश देण्यात आला आहे.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar: सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या "हिरामंडी" (Heeramandi) या वेब सीरिजची चर्चा होत आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला आणि या वेब सीरिजमधील डायलॉग्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. अशातच आता मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर हिरामंडी या वेब सीरिजमधील डायलॉग शेअर करुन नागरिकांना एक खास संदेश देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची ही पोस्ट अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) रिपोस्ट केली आहे.

मुंबई पोलिसांची पोस्ट

मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "एक बार देख लीजिए दीवाना बना दीजिए चालान काटने के लिए तैय्यार है हम तो हेलमेट पहन लीजिये!" तसेच मुंबई पोलिसांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "पुराने पासवर्ड दोहरे नहीं जाते, भुला दिए जाते हैं!", "ओटीपी बताने और बर्बाद होने के बीच में कोई फरक नहीं होता!", असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

अमृताची पोस्ट

अमृताने एक इंस्टाग्राम स्टोरी टाकून मिश्किलपणे मुंबई पोलीस आणि त्यांचा भन्नाट क्रिएटिव्हच कौतुक केलं आहे. "मुंबई पोलीस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये " असं खास कॅप्शन देऊन अमृतानं मुंबई पोलिसांची पोस्ट रिपोस्ट केली आहे.

Amruta Khanvilkar

आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी 24/7 काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच करावं तेवढं कमीच आहे. कायम नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी ते त्यांना आव्हान करत असतात पण मुंबई पोलीस यांनी एकदम फिल्मी स्टाईल आता नागरिकांना सुरक्षित राहण्याच आव्हानं केलं आहे.

अमृता कायम तिच्या सोशल मीडियावरून चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते आणि तिची आजची ही इन्स्टा स्टोरी मुंबई पोलीस यांच्यासाठी खास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: जनगणनेसाठी मोठं बजेट मंजूर; ऊर्जा सुधारणा आणि कृषी क्षेत्रात बदल अन्..., केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Mumbai Viral Video: अरे संसार संसार, पण शौचालयात कसा थाटला? मुंबईत धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

"माझ्याकडे घरही नव्हतं आणि डॉक्टरांनी.." सोनाली बेंद्रेने सांगितला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचा अनुभव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पर्यावरण रक्षणाला चालना, हरित लवादाच्या निर्णयाचं स्वागत

Ginger-Lemon-Honey Tea By Chef Sanjeev Kapoor: थंडीत आरोग्याची काळजी घेणारा 'स्पेशल चहा'; शेफ संजीव कपूर यांनी सांगितली सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT