Anant Ambani First look At Wedding Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : शेरवानीवर स्पोर्ट्स शूज, लग्नसोहळ्यासाठी असे सजले अनंत अंबानी, विधींपूर्वीचा फर्स्ट लूक चर्चेत

Anant Ambani First Look Went Viral : वर अनंत अंबानीने स्वतःच्याच लग्नसोहळ्याला घातलेल्या आऊटफिटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काय आहे खासियत जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Anant & Radhika Wedding : आज बहुप्रतीक्षित अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा पार पडतोय. या लग्नसोहळ्याची वरातही थाटात निघाली आणि वरपक्ष लग्नसोहळ्याच्या ठिकाणी वेळेत हजर झाला. लग्नसोहळा सुरु होण्यापूर्वी अनंत अंबानीने केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्याच्या या आऊटफिटची चर्चा रंगलीय.

सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोजमध्ये अनंताचा लग्नपूर्वीच लूक पाहायला मिळतोय. भगव्या रंगाची शेरवानी, पायजमा या लूकमध्ये अनंत लग्नस्थळी हजर झाला. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या पायातील स्पोर्ट्स शूजने. शेरवानीला शोभतील अशी पादत्राणे घालण्याऐवजी चक्क अनंतने स्वतःच्याच लग्नाला स्पोर्ट्स शूज घालणं पसंत केलं. त्याचा हा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनंत अंबानी वगळल्यास संपूर्ण अंबानी कुटूंबाने पिंक रंगाच्या पेस्टल शेडचे सारख्या डिझाईनचे कपडे घालून येणं पसंत केलंय. श्लोका, ईशा यांनी गुलाबी रंगाच्या पेस्टल शेड्समधील लेहेंगे परिधान केले आहेत. तर मुकेश अंबानी, मुलगा आकाश आणि जावई आनंद पिरामल यांनी त्यांच्या पत्नीच्या लुकला आणखी शोभून दिसतील असे गुलाबी रंगाचाच शेरवानी घातल्या आहेत. वरमाई नीता अंबानी यांची भगव्या आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असलेली डिझायनर साडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय.

सोशल मीडियावर हे फोटोज व्हायरल झाले असून अनेकांनी कमेंट्स करत अनंत आणि राधिकाला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सगळेचजण अनंतचा लग्नातील लूक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. थोड्याचवेळात वरमालेचा विधी थाटात पार पडणार आहे.

Anहा ग्रँड विवाहसोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये थाटात पार पडणार असून या सोहळ्याला जगभरातील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार, राजकारणातील नेतेमंडळी, अनेक उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला हजर असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT