apurva nemlekar esakal
Premier

बापावरून बोललेलं मी नाही ऐकणार... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली- तुमचे निर्माते जेव्हा

Apurva Nemlekar Talked About Ratris Khel Chale: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने 'रात्रीस खेळ चाले ' ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

Payal Naik

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने आपल्या मेहनतीच्या जोरावर कोणाचाही पाठिंबा नसताना या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने 'बिग बॉस मराठी' चा चौथा सीझन गाजवला. मात्र खऱ्या आयुष्यात अपूर्वाने खूप अडथळे पार केले. आपल्या जवळच्या दोन व्यक्तींचा मृत्यू पाहिला. मात्र अपूर्वाला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमधून. परंतु, दुसऱ्या भागाच्या शेवटी अपूर्वाने अचानक ही मालिका सोडली. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता अखेर एका मुलाखतीत अपूर्वाने तिने हिने मालिका का सोडली याबद्दल सांगितलं आहे.

निर्मात्यांसोबतचा वाद

अपूर्वाने नुकतीच राजश्री मराठीच्या तिची गोष्ट या सेगमेंटमध्ये हजेरी लावली. यामध्ये बोलताना तिने रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं कारण सांगितलं. अपूर्वा म्हणाली, 'जेव्हा आपण एका भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतो त्याच भूमिकेसाठी आलेलं रिजेक्शन मी नाही विसरू शकत. आमचे मेकर्स म्हणजे त्यावेळेला चॅनेलचे हेड जे होते, मालिकेचे निर्माते होते. त्यांनी मला एका वादात असं म्हटलं होतं, तू शेवंता केली तर काही ग्रेट नाही केलं. दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीने केलं असतं तरी इतकंच छान केलं असतं. कारण आमच्या लिखाणात मजा होती. आणि ते जेव्हा एका कलाकाराला लागतं ना की तुम्ही जीव तोडून काम करता आणि तुझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकं काही सुरू असतं. १२- १२ तास प्रवास करून झोपमोड करून तुम्ही त्या भूमिकेत जीव ओतता आणि तुमचे मेकर्स तुला म्हणतात की तू केलंस ते काही ग्रेट नाही केलंस तेव्हा ते जीवाला लागतं.'

हक्काचे पैसे मागितले म्हणून...

अपूर्वा पुढे म्हणाली, 'मग मला बघायचंच आहे की कुठली अभिनेत्री आहे जी एवढ्या ताकदीने भूमिका करू शकते. मग आता मी नाही करणार. आणि असंही नव्हतं की मी खूप काही मागितलंय म्हणून हे वाद झालेत. बेसिक पैशांची अपेक्षा. ज्यामुळे माझं घर चालणार आहे. आणि तुम्ही तेच मला देणार नसाल, त्यावर मी माझा आवाज उठवला तर ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर सॉरी बॉस. हा सगळा खेळ पैशांचा आहे. शेवंता म्हणून कुणी माझ्या घरचं राशन नाही भरणार.

बापावरून बोललेलं मी नाही ऐकणार

बऱ्याच गोष्टी आमच्या सेटवर घडल्या. आमच्या प्रोड्युसरच्या असिस्टंटकडून इतरांना चुकीची वागणूक दिली जात होती. त्यांची मुजोरी खूप वाढली होती. कसेही बोलायचे ते इतरांशी आमच्या सेटवरही एक असं होतं की तू नाही केलंस तर दुसरा व्यक्ती आहे. प्रत्येकाला असं वाटतं आहे याचा मला भयंकर राग आहे. ज्यांना अशी वागणूक मिळत होती मी त्यांच्या बाजूने बोलले एकदा. तर तो वाद वाढला, पर्सनल कमेंट केले गेले आणि बापावरून वगरे बोललं गेलं. तर ते माझ्या जिव्हारी लागलं. आणि माझे बाबा नुकतेच गेले होते. बाबा म्हणजे माझं दैवत. मग मी कुणाचं ऐकत नसते. मग सगळ्यांची काढली होती. मी नाही ही वागणूक खपवून घेणार. माझ्याच नाही इतर कुणाच्याही बाबतीत. मग ते पेटत गेलं. मग ते यावर आलं की तू नाही केलं तरी काही फरक पडत नाही. मग म्हटलं ठीक आहे. बघूया किती फरक पडतो आणि किती नाही ते.' यासगळ्याबद्दल अपूर्वाने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT