Govinda esakal
Premier

Govinda: गोविंदाची भाची 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; मुंबईतील व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ

Govinda: गेल्या कित्येक दिवसांपासून आरतीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आरतीने तिच्या लग्नाबाबत आणि होणाऱ्या नवऱ्याबाबत खुलासा केला.

priyanka kulkarni

Govinda: अभिनेता गोविंदाच्या (Govinda) घरी लगीनघाई सुरु झालीये. गोविंदाची भाची अभिनेत्री आरती सिंग (Arti Singh) लग्न करत असून तिने स्वतःच तिच्या लग्नसोहळ्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. गेल्या कित्येक दिवसांपासून आरतीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आरतीने तिच्या लग्नाबाबत आणि होणाऱ्या नवऱ्याबाबत खुलासा केला.

आरती आणि दीपक 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

येत्या २५ एप्रिल २०२४ ला आरतीचं लग्न मुंबईत पार पडणार आहे. आरतीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव दीपक चौहान असून तो नवी मुंबईतील व्यावसायिक आहे. याबाबत अधिक माहिती तिने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. ती म्हणाली,"मागच्या वर्षी आमची ओळख झाली. मागच्या वर्षी २३ जुलैला आम्ही पहिल्यांदा बोललो आणि त्यानंतर ५ ऑगस्टला भेटलो. त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आमची मैत्री झाली आणि नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला पण दोन्ही कुटूंबांनी होकार देईपर्यंत आम्ही पुढे गेलो नाही. १ जानेवारीला दिपकने मला गुरुजींच्या मंदिरात लग्नासाठी मागणी घातली आणि मी लगेच होकार दिला. तेव्हाच आमचा साखरपुडा झाला असं मी मानते."

तिच्या लग्नाबद्दल आणखी सांगताना आरती म्हणाली,"जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न करायचं ठरवता तेव्हा मनात काही शंका असतात, काही अडचणी येतात. पण दीपकला भेटल्यावर तसं काहीच वाटलं नाही. तो माझ्या आयुष्यात शांतता आणतो. मी भाग्यवान आहे कि तो माझ्या आयुष्यात आहे. मी जशी आहे तशी त्याच्यासमोर, त्याच्या दोन बहिणींसमोर आणि वडिलांसमोर वागू शकते. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात आणि आता माझी नात्यांविषयीची समज वाढली आहे."

तिला यानंतर तिला तिने तिच्या मामांना म्हणजेच अभिनेता गोविंदा यांना लग्नाविषयी सांगितलं का? असं विचारण्यात आलं यावर तिने,"हो, मी चि-चि मामांना फोन करून लग्नाविषयी सांगितलं आणि ते माझ्यासाठी खूप खुश आहेत. मला आशा आहे कि ते माझ्या लग्नाला येऊन मला आशीर्वाद देतील. खरंतर मला खात्री आहे कि ते नक्की येतील. " असं ती सांगतांना म्हणाली.

यासोबतच आरतीने तिच्या नवऱ्याचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर रिव्हील केला. सोशल मीडियावर या जोडीचा फोटो व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी आरतीचा वाढदिवस सुद्धा होता. तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला खास सरप्राईज दिलं होतं. सोशल मीडियावर सगळ्यांनाच आरतीला मिळालेलं सरप्राईज पसंत पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT