Arti Singh esakal
Premier

Arti Singh: आरतीची ब्रायडल शॉवर पार्टी; वहिनी आणि भावाने केली धमाल

Arti Singh: भाऊ कृष्णा आणि वहिनी कश्मिरा यांनी आरतीसाठी ब्रायडल शॉवर आयोजित केला होता.

priyanka kulkarni

Arti Singh: कृष्णा अभिषेकची बहीण आणि गोविंदा यांची भाची आरती सिंग (Arti Singh) हिचं लवकरच लग्न आहे. तिच्या या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झालीये. नुकतंच तिचा भाऊ कृष्णा आणि वहिनी कश्मिरा यांनी आरतीसाठी ब्रायडल शॉवर आयोजित केला होता. सोशल मीडियावर या पार्टीचे व्हिडीओज सध्या व्हायरल झाले आहेत.

कृष्णा आणि कश्मिराने या पार्टीत त्यांच्या सगळ्या खास मित्रांना बोलावलं होतं तर त्यांच्या नातेवाईकांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. अभिनेत्री आणि आरतीची बहिणी रागिणी खन्ना आणि तिच्या आईनेही या पार्टीत हजेरी लावत तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आरतीने केलेल्या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ब्लु रंगाचा शिमरी शॉर्ट ड्रेस आरतीने यावेळी घातला होता तर कश्मिराने पर्पल रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट वेअर केला होता. त्यांचा हा पार्टी लूक सगळ्यांना खूप आवडला. तर पापाराझींनी सुद्धा आरतीला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

२५ एप्रिल २०२४ ला आरतीचं लग्न होणार आहे. दीपक चौहानसोबत तिचं लग्न होणार असून मुंबईतील इस्कॉन मंदिरात साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. आरतीला पहिल्यापासूनच साधेपणाने लग्न करायचं होतं. तिची बनारसमध्ये लग्न करण्याची इच्छा होती पण ते शक्य न झाल्यामुळे तिने इस्कॉनमध्ये लग्न करण्याचं ठरवलं. कुटूंब आणि जवळचे सगळे मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थिती त्यांचं लग्न पार पडणार आहे. त्या आधीचे लग्नाचे विधी त्यांच्या घरी पार पडणार आहेत.

काही दिवसांपूर्वी आरतीने काशी विश्वनाथ मंदिरात लग्नाची पत्रिका ठेवून देवाचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावरसुद्धा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गोविंदा या लग्नाला हजेरी लावून आरतीला आशीर्वाद देणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद सुरु असून बराच काळ ते एकमेकांशी बोलत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी आरतीने एका मुलाखतीत गोविंदा यांनी तिला फोनवर आशीर्वाद दिल्याचं तिने सांगितलं आणि त्यांनी तिच्या लग्नात उपस्थित राहावं अशी आशा तिने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT