arun govil and dipika chikhlia sakal
Premier

अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांचे 'या' सिनेमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण

रामायण या ३०-३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेली मालिका आजही तितकीच हिट आहे. या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया या कलाकारांना अजूनही प्रेक्षक विसरले नाहीयेत.

सकाळ डिजिटल टीम

रामायण या ३०-३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेली मालिका आजही तितकीच हिट आहे. या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया या कलाकारांना अजूनही प्रेक्षक विसरले नाहीयेत.

टेलिव्हिजनवर ही गाजलेली जोडी आता मराठी सिनेविश्वात पदार्पण करतेय. या दोघांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार असून हे दोघे वीर मुरारबाजी या सिनेमात काम करत आहेत.

अजय आरेकर यांची निर्मिती असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या सिनेमात अभिनेता अंकित मोहन वीर मुरारबाजी यांची भूमिका साकारणार आहे. पण या सिनेमात अरुण आणि दीपिका कोणती भूमिका साकारणार ते अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. त्या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा असून त्यांची या सिनेमातील भूमिका जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान अंकितने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली असून यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंकितचं लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं. सिनेमाच्या पोस्टरवरील अंकितच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुरारबाजींच्या लूकमधील अंकितच्या हातातील तलवार आणि शत्रूला लढाईसाठी आव्हान देणारी नजर, तगडी शरीरयष्टी चर्चेचा विषय ठरली आहे.

पुरंदरच्या लढाईत अद्भुत पराक्रम गाजवणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची शौर्यगाथा वीर मुरारबाजी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पुरंदरचा तह होऊ नये म्हणून मुरारबाजी यांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या पराक्रमाने शत्रू सैन्यही थक्क झाल्याचं इतिहासात सांगितलं आहे.

या सिनेमात अंकित, अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांच्या व्यतिरिक्त अजून कोण कलाकार दिसणार? सिनेमा कधी रिलीज होणार? हे अजून सिनेमाच्या टीमने उघड केलं नाहीये. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनसुद्धा अजय आरेकर यांनी केलं असून ए ए फिल्म्सने या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे.

दरम्यान, अरुण गोविल नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण सिनेमातही काम करत आहेत. या सिनेमात ते राजा दशरथाची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर त्यांचे या लूकमधील पोस्टर व्हायरल झाले होते. तर दीपिकाही बराच काळ कोणत्याही कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीस न आल्याने त्यांच्या कमबॅकसाठी सुद्धा प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT