Hastay Na Hasaylach Pahije ESAKAL
Premier

Hastay Na Hasaylach Pahije: भाऊ, निलेश आणि ओंकार भोजनेचा नवा धमाका; 'या' नव्या कार्यक्रमातून करणार कमबॅक

Hastay Na Hasaylach Pahije: अभिनेता, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) हा नवीन कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या शोचं नाव आहे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!!'

priyanka kulkarni

Hastay Na Hasaylach Pahije: सध्या अनेक रिऍलिटी शोज, मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर देखील अनेक नवीन मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकांचे प्रोमोज चर्चेत असतानाच एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) हा नवीन कॉमेडी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या शोचं नाव आहे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!!'.

निलेश या कार्यक्रमाच्या दिग्दर्शन, सूत्रसंचालन आणि लेखन करणार असून त्याच्या बरोबर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे कलाकारही कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. या सोबतच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. यासोबतच सुपरस्टार भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये सेलिब्रिटी परीक्षक म्हणून हजेरी लावणार आहेत. सोशल मीडियावर निलेश, भाऊ आणि ओंकार यांचे फोटोज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. २० एप्रिल २०२४ पासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट

येत्या काही दिवसात झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने गेल्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. निलेश यांनीच या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं होतं तर भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या कलाकारांनी या कार्यक्रमाला चारचाँद लावले. एक दशक प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कलाकारांनी जाहीर करताच प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. प्रकृतीच्या कारणामुळे निलेश यांनी कार्यक्रमातून आधी एक्झिट घेतली त्यानंतर त्यांनी ''हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!' या नव्या कार्यक्रमाची घोषणा करत प्रेक्षकांना सरप्राईज दिलं.

प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कलर्स मराठीवरील या नवीन कार्यक्रमाच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ते हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हंटल तर काहींनी महायुती म्हणत या नवीन कास्टचं कौतुक केलंय. तर ओंकार भोजनेच्या चाहत्यांनीया पोस्टवर कमेंट करत त्यांचा आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT