Tula Shikvin Changlach Dhada  Esakal
Premier

Tula Shikvin Changlach Dhada : अक्षरा-अधिपतीच्या मधुचंद्रात भुवनेश्वरी टाकणार मिठाचा खडा

Tula Shikvin Changlach Dhada Serial : झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Zee Marathi : टेलिव्हिजनवरील मालिका आणि त्यातील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. सध्या टेलिव्हिजनवरील गाजणारी मालिका म्हणजे झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा. अक्षरा आणि अधिपतीची गोष्ट असणारी ही मालिका प्रेक्षक खूप एन्जॉय करतात आणि आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

मालिकेत नवा ट्विस्ट

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. अक्षराने अधिपतीजवळ अखेर तिचं त्याच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली आहे. ते दोघेही नवरा-बायको म्हणून एकत्र आल्याने भुवनेश्वरीला मात्र त्रास होतोय.

अक्षरा आणि अधिपती त्यांचा मधुचंद्र साजरा करणार आहेत. ते एकमेकांसोबत रोमँटिक टाईम घालवत असतानाच भुवनेश्वरी तिथे येते आणि अधिपतीला तिला त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं सांगते.

पहा प्रोमो

मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना भुवनेश्वरी आता अधिपतीसमोर नेमकी काय अट ठेवणार ? अक्षरापासून अधिपतीला दूर ठेवण्यासाठी भुवनेश्वरी काय चाल खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांना हा प्रोमो आवडला तर काहींनी आता मालिका संपवण्याची मागणी केली. "मालिकेत आता खूप नकारात्मकता दाखवत आहात आता कथानक बदला" अशी मागणी काही प्रेक्षकांनी केली तर काहींनी "डाव रचणे आणि उधळणे हाच moto आहे सगळ्या चॅनेल वर" असं म्हणत मालिकेच्या टीमची कानउघडणी केली.

या आधीही भुवनेश्वरीने अक्षरा आणि अधिपतीला दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी त्यांनी सरगम नावाची शिक्षिका निवडली आणि तिला पैसे देऊन अधिपतीशी मैत्री वाढवायला सांगितली. तर अक्षराशी काही ना काही कारणावरून भांडण करून अधिपतीला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला असं पाहायला मिळालय. त्यामुळे अक्षरा यावेळी भुवनेश्वरला कसं उत्तर देणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तेव्हा पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा दररोज रात्री ८ वाजता फक्त झी मराठीवर.

मालिकेची कास्ट

कविता मेढेकर, हृषीकेश शेलार, शिवानी रांगोळे यांची या मालिकेत मुख्य भूमिका असून या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तिचा नवरा तेजस देसाई यांनी केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT