bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 latest Voting Trends: या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ५ सदस्य नॉमिनेटेड आहेत. त्यातील दोन आता बॉटम २ मध्ये आहेत.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दररोज नव्या गोष्टी घडत आहेत. गेल्या आठवड्यात घरातील दोन सदस्य घराबाहेर झाले. वैभव चव्हाण कमी वोट पडल्याने घराबाहेर झाला तर आर्या ही निक्कीला कानाखाली मारल्याने घराबाहेर झाली. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पाच स्पर्धक नॉमिनेटेड आहेत. त्यात सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निकी तांबोळी, वर्षा उसगावकर आणि अरबाज पटेल यांचा समावेश आहे. यापैकी आता घराबाहेर कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कोण आहे टॉपला?

या संपूर्ण आठवड्यात सुरज चव्हाण सुरुवातीपासूनच टॉपला आहे. जेव्हा जेव्हा सुरजला वोटिंग करायची वेळ येते तेव्हा तेव्हा त्याचे चाहते सुरजला भरभरून वोट करताना दिसतात. तर त्याच्या पाठोपाठ सुरुवातीला खालच्या स्थानावर असलेली जान्हवी दुसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचं म्हणजे तिचा खेळ बदलल्यानंतर तिच्या वोटिंगमध्येही वाढ झाली आहे. तर यात निक्की बॉटम २ मध्ये असेल असा अंदाज सगळ्यांनी लावला होता पण तसं नाहीये. निक्कीचे चाहतेही तिला खूप वोट करत आहेत आणि घराबाहेर जाण्यापासून वाचवत आहेत. त्यामुळे ती या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

कुणाला सगळ्यात कमी वोट्स?

या आठवड्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर या कमी मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर अरबाज पटेल याला सगळ्यात कमी मतं मिळाली आहेत. अरबाज या आठवड्याचा कॅप्टन असला तरी कमी मतांमुळे तो घराबाहेर होऊ शकतो. तर ही बाजी पालटून वर्षादेखील घराबाहेर जाऊ शकतात. आता नेमकं कोण घराबाहेर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT