Blackout  SAKAL
Premier

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

Blackout: नुकताच 'ब्लॅकआऊट' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

priyanka kulkarni

Vikrant Massey Film: '12वी फेल' (12th Fail) या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey ) विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता विक्रांतच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव 'ब्लॅकआऊट' (Blackout) असं आहे. नुकताच 'ब्लॅकआऊट' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

ब्लॅकआऊट या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अनिल कपूर यांचा "वक्त बदलने वाला है!" हा डायलॉग ऐकू येतो. या टीझरमध्ये विक्रांत मेस्सी हा एक गाडी चालवताना दिसत आहे. त्या गाडीची धडक दुसऱ्या गाडीला होते, त्यानंतर विक्रांतच्या गाडीमधील सर्व सामान बाहेर पडते. त्या सामानात पैसे, सोन्याचे दागिने असतात. हे पाहून विक्रांत आश्चर्यचकित होतो. त्यानंतर टीझरमध्ये पुढे मौनी रॉय आणि सुनील ग्रोवर यांची देखील झलक बघायला मिळते.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौरभ घाडगे और करण सोनावणे हे देखील ब्लॅकआऊट या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार ब्लॅकआऊट?

ज्योती देशपांडे आणि नीरज कोठारी यांनी ब्लॅकआऊट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर देवांग भावसारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 7 जून, 2024 रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

ब्लॅकआऊट या चित्रपटासोबतच लवकरच विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत राशी खन्ना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT