Aishwarya Rai Bachchan sakal
Premier

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्यानं कान्स फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची चर्चा झाली. ऐश्वर्याचा फ्रॅक्चर झालेल्या हातानं देखील अनेकांचे लक्ष वेधलं.

priyanka kulkarni

Aishwarya Rai Bachchan Cannes 2024: कान्स फेस्टिव्हलमध्ये (Cannes 2024) बॉलिवूडमधील कलाकार सहभाग घेत आहेत. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan) देखील या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. ऐश्वर्यानं कान्स फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची चर्चा झाली. ऐश्वर्याचा फ्रॅक्चर झालेल्या हातानं देखील अनेकांचे लक्ष वेधलं. पण सध्या ऐश्वर्यासोबतच तिची लेक आराध्याचं देखील कौतुक होत आहे.

ऐश्वर्याचा लूक

ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी खास लूक केला होता. ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ड्रेस त्यावर डोल्डन कलरची ज्वेलरी अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमध्ये ऐश्वर्या दिसली. यावेळी ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर झालेला दिसला. अशातच आराध्या ही आईची काळजी घेत होती. त्यामुळे तिचं सध्या कौतुक होत आहे.

आराध्याचं होतंय कौतुक

अनेकजण सोशल मीडियावर आराध्याचं आईची काळजी घेतल्याबद्दल कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याचे कान्स फेस्टिव्हलमधील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिल, "ऐश्वर्या जिथे जाते तिथे आराध्या तिला फॉलो करते.आराध्या आईला सपोर्ट करत होती."

दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "आराध्या ही आतापर्यंतची सर्वात जास्त संस्कृती जपणारी स्टारकिड आहे. तिचे तिच्या आईवरचे बिनशर्त प्रेम आहे."

ऐश्वर्याचा शेवटची पोन्नियिन सेल्वन: 2 हा मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. आता ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय कियारा अडवाणी आणि शोभिता धुलिपाला या देखील कान्समध्ये हजेरी लावणार आहेत. उर्वशी रौतेला आणि शार्क टँक इंडियाची परीक्षक नमिता थापरने देखील कान्स 2024 मध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT