Chala Karu Matdaan esakal
Premier

Chala Karu Matdaan: "चला करु मतदान"; 'खास रे टीव्ही'चं भन्नाट गाणं एकदा ऐकाच!

Chala Karu Matdaan: खास रे टीव्हीचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं नाव "चला करु मतदान" असं आहे.

priyanka kulkarni

Chala Karu Matdaan: 'खास रे टीव्ही' (Khaas Re TV) या युट्यूब चॅनलच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. खास रे टीव्ही या युट्यूब चॅनलवर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर केले जातात. त्यांच्या लस घ्या, चुलीवर, काम द्या, दमलेल्या निब्ब्याची कहाणी या खास रे टीव्हीच्या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली. अशातच आता खास रे टीव्हीचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे.

खास रे टीव्हीचं 'खास' गाणं

सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच लोकांना "मतदान करा" असा संदेश देणारे खास रे टीव्हीचं "चला करु मतदान" हे गाणं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. या गाण्यात काही तरुण पुण्यातील रस्त्यांवर मतदानाबद्दल जनजागृती करताना दिसत आहेत.

"चला करु मतदान" या गाण्याला कोलावरी-डी या धनुषच्या प्रसिद्ध गाण्याचं संगीत देण्यात आलं आहे. हे गाणं संजय श्रीधर आणि आतिश हरेल यांनी लिहिलं आहे तर निरंजन पेडगांवकर हे गाणं गायलं आहे.

पाहा गाणं:

"चला करु मतदान" या गाण्याला आतापर्यंत जवळपास 4,826 व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या गाण्याला कमेंट केली, "एकच नंबर गाणं आहे पुढील वाटचालीसाठी खास रे टीमला शुभेच्छा" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "अगदी योग्य वेळी जागृतीचा संदेश दिला आहे. वास्तव बोल आहेत. जागर मतदानाचा जागर आपल्या मूलभूत हक्कांचा"

खास रे टीव्हीला युट्यूबवर 555K सब्सक्राइबर्स आहेत. त्यांचे व्हिडीओ नेटकरी आवडीनं बघतात. विविध नेत्यांच्या मुलाखतींचे व्हिडीओ देखील खास रे टीव्हीच्या युट्यूब चॅनलवर शेअर केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT