Coldplay 
Premier

Coldplay: सध्या चर्चेत असलेलं 'कोल्डप्ले' कितव्या अल्बमनंतर घेणार निवृत्ती? ख्रिस मार्टिनने केला खुलासा

British band Coldplay: कोल्डप्ले बँडचा प्रमुख ख्रिस मार्टिन याने ग्रुप कधी निवृत्ती घेणार याबाबत खुलासा केला आहे. Apple Music वरील झेन लोवेला दिलेल्या मुलाखतीत ख्रिस म्हणालाय की, १२ वा अल्बम निघाल्यानंतर ते थांबणार आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्ले (Coldplay) सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. असे असताना या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. कोल्डप्ले बँडचा प्रमुख ख्रिस मार्टिन याने ग्रुप कधी निवृत्ती घेणार याबाबत खुलासा केला आहे. Apple Music वरील झेन लोवेला दिलेल्या मुलाखतीत ख्रिस म्हणालाय की, १२ वा अल्बम निघाल्यानंतर ते थांबणार आहेत.

कोल्डप्लेच्या सध्या १० व्या अल्बमची जोरदार चर्चा सुरु आहे. हा अल्बम ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रिलिझ होणार आहे. त्यात ख्रिसने स्पष्ट केलंय की, त्याची टीम १२ वा अल्बम निघाल्यानंतर थांबणार आहे. तो म्हणाला की, आम्ही फक्त १२ व्या अल्बमपर्यंतच जाणार आहोत आणि हे निश्चित आहे.

आम्ही किती अल्बम काढायचे याबाबत निश्चित आहोत. आम्हाला जास्त अल्बम काढायचे नाही. कमी हेच जास्त असते. आमच्या विरोधकांसाठी ते आणखी कमी केलं असतं तरी ते जास्त राहिलं असतं. मला वाटतं आपण आपली मर्यादा ठरवून घेणे महत्त्वाचे असते, असं देखील ख्रिस म्हणाला आहे.

ख्रिसने स्पष्ट केलं की, त्याचा हा निर्णय जुन्या बँड म्युझिकल हिरोंकडून प्रेरणा घेऊन घेण्यात आलेला आहे. यावेळी त्याने बॉब मार्लेचं नाव घेतलं. फक्त सातच हॅरी पॉटरचे पार्ट्स आहेत. बिटल्स केवळ साडेबारा आहेत. कमी केल्यामुळे आपण गुणवत्तेकडे लक्ष देतो. या मानसिकतेमुळे म्युझिकचा दर्जा वाढतो आणि गुणवत्तेकडे जास्त लक्ष दिलं जातं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

एक उत्तम दर्जाचा बँड आणि अल्बम तयार करणे कष्टाचे काम आहे. यात माणसांची मोठी गुंतवणूक असते. त्यामुळे मला आता माझ्या सहकाऱ्यांना त्यांचे आयुष्य जगण्याची संधी द्यायची आहे, असं ख्रिस म्हणाला. यापूर्वी ख्रिसने आपण २०२५ मध्ये शेवटचा अल्बम रिलिझ करू असे संकेत दिले होते. मात्र, बँड जुनेच अल्बमचे गाणे जगातील दौऱ्यादरम्यान सादर करण्याची शक्यता आहे.

कोल्डप्ले बँडमध्ये सध्या असलेले सदस्य

ख्रिस मार्टिन (गायक आणि पियानोवादक), जॉनी बकलँड (गिटार वादक), गाय बेरीमन (बासवादक), आणि विल चॅम्पियन (ड्रमर आणि तालवादक), फिल हार्वे त्यांचा मॅनेजर म्हणून काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT