colors marathi new serial  sakal
Premier

अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; नवी मालिका 'आई तुळजाभवानी'चा प्रोमो चर्चेत

Colors Marathi New Serial "Aai Tuljabhavani" Promo: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीवर एक नवीन मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Payal Naik

New Serial On Colors Marathi: सध्या सगळीकडे 'बिग बॉस मराठी' सीझन ५ ची चर्चा आहे. मराठी बिग बॉस पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पहिल्याच दिवशी घरात काय राडा होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. काळ २८ जुलै रोजी कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमिअर पार पडला. मात्र या सर्व गोंधळात कलर्स मराठीने प्रेक्षकांना आणखी एक भेट दिली आहे. कलर्स मराठीवर आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या पोस्टमध्ये कलर्स मराठीने ही घोषणा केली आहे. कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या मालिकेमधून अखंड महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसात कलर्स मराठीवरील अनेक मालिका बंद करण्यात आल्या. या मालिकांमध्ये 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं', 'रमा राघव', 'पिरतीचा वणवा उरी पेटला', 'भाग्य दिले तू मला' या मालिकांचा समावेश होता. त्यानंतर ‘सुख कळले’, ‘अबीर गुलाल’, ‘अंतरपाट’ यांसारख्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. टीआरपीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. 'बिग बॉस मराठी ५' देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली प्रेक्षकांसाठी आणखी एक पौराणिक मालिका कलर्स मराठी सुरू करणार आहे. 'आई तुळजाभवानी' असं या मालिकेचं नाव असून त्या मालिकेत देवीचा महिमा दाखवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

कलर्स वाहिनीने मालिकेचा टीझर प्रदर्शित केला आहे. यात व्हीएफएक्स दिसत आहे. या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीसमोर हात जोडून बसले आहेत. त्यानंतर देवी प्रकट होते आणि तिची भवानी तालावर महाराजांना देते असं या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं आहे. आता ही मालिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षक या टीझरवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही कधीपासून या मालिकेची वाट पाहत होतो असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ही मालिका कधीपासून सुरू होणार याबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT