aai tuljabhawani  esakal
Premier

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

Colors Marathi Aai Tulja Bhawani Serial Episode :कलर्स मराठीच्या नव्या मालिकेचं प्रसारण काही तांत्रिक कारणामुळे रखडलं होतं. त्यावर प्रेक्षकांनी कलर्सला जाब विचारला आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशीच एक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली ती म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी'. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेची गाथा दाखवणारी ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका सुरू झाल्यानंतर काही आठवड्यातच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक आवडीने ही मालिका पाहतात. मात्र कालच्या भागात म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी वाहिनीने मालिकेचा जुनाच भाग प्रक्षेपित केला त्यामुळे प्रेक्षकही गोंधळले. त्यांनी वाहिनीवर रोष व्यक्त केल्यानंतर आता वाहिनीने देखील माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे.

चांगला व्हीएफएक्स, गोष्टीची उत्तम मांडणी, चांगले कलाकार यामुळे 'आई तुळजाभवानी' ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांची आवडती बनली. मात्र या मालिकेच्या कालच्या ( २४ ऑक्टोबर २०२४ ) एपिसोडचं प्रसारण तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलं. अचानक जुनाच भाग प्रक्षेपित झाल्याने प्रेक्षकही गोंधळले. त्यानंतर अनेकांनी कलर्स वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवर याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मात्र वाहिनीने एक पोस्ट करत याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कलर्सने एक पोस्ट करत लिहिलं, 'काही तांत्रिक कारणांमुळे तुमच्या आवडत्या मालिकेचा ‘आई तुळजाभवानी’चा कालचा भाग आज दाखवण्यात आला. उद्यापासून मालिका नियमितपणे दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होईल. गैरसोयीबद्दल क्षमस्व!'

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे मुख्य भूमिका साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसेच तिने कथकचंही शिक्षण घेतलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने पूजाने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

'मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता. कारण...' रितेश देशमुख म्हणाला, 'सेट उभा करण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : अमरावतीत स्कूलबसच्या भाड्यात २५ टक्के वाढ

बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

Hasan Mushrif : साखर कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ, मुश्रीफ असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT