Dalljiet Kaur sakal
Premier

Dalljiet Kaur: दलजीत कौरचा दुसरा संसारही मोडला? पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची चर्चा, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "तू आता निर्लज्जपणे..."

Actress: दलजीतनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दलजीतनं पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल लिहिलं आहे.

priyanka kulkarni

Dalljiet Kaur: प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी दलजीतनं केनियास्थित उद्योगपती निखिल पटेलसोबत (Nikhil Patel) लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 10 महिन्यांनंतर दलजीत आणि निखिल यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. दलजीत ही भारतात परतली आहे. अशातच आता दलजीत आणि निखिल यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चर्चेदरम्यान दलजीतनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दलजीतनं पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल लिहिलं आहे.

दलजीत कौरची पोस्ट

दलजीतनं पोस्टमध्ये लिहिलं, "तू आता निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर दिसत आहेस. तुझी पत्नी आणि मुलगा लग्नाच्या 10 महिन्यांनंतर भारतात परतले, संपूर्ण कुटुंबाचा अपमान झाला. तू मुलांसाठी थोडी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती.” दलजीतने पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, “किमान तू सार्वजनिक ठिकाणी तुझ्या पत्नीला थोडा सन्मान द्यायला हवा होतास कारण मी इतर अनेक गोष्टींबद्दलही गप्प राहिले होते."

Dalljiet Kaur

दलजीतनं तिचा नववधूच्या लूकमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन दलजीतनं तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "ती तिच्या मुलांच्या फायद्यासाठी मौन धरते. तिच्या कुटुंबासाठी ती सर्वकाही करत असते. एसएन, तुलाही मूल आहे का?"

दलजीतचे पहिले लग्न अभिनेता शालीन भानोतसोबत झाले होते. या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दलजीत आणि शालीनचा घटस्फोट झाला. यानंतर दलजीतने निखिल पटेलसोबत दुसरे लग्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT