Deepika Padukon 
Premier

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

Deepika Padukon & Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोणने आज मुंबईत मतदान केलं. दीपिकाच्या बेबी बंपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर रणवीर बायकोची घेत असलेली काळजी बघून नेटकरी भारावले.

सकाळ डिजिटल टीम

आज देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, धुळे, नाशिक या भागांमध्येही आज मतदान पार पडतय. मुंबईत सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीजनीही हजेरी लावत मतदानाचा हक्क पार पाडत आहेत.

मतदान करणाऱ्या सेलिब्रिटीजचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते पॅरेंट्स टू बी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने.

रणवीर आणि दीपिका दोघांनी आज मुंबईत मतदान केलं. पांढरा शर्ट आणि डेनिम या लूकमध्ये त्या दोघांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. प्रेग्नेंट असलेल्या दीपिकाची काळजी घेणाऱ्या रणवीरचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

रणवीरने तिला कार मधून उतरायला मदत केली इतकंच नाही तर तिला मतदान केंद्रापर्यंत हाताने धरून नेलं. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये दीपिकाचा बेबी बंप दिसत असून तिला चालताना थोडासा त्रास होत असल्याचंही चाहत्यांच्या निदर्शनास आलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी कमेंट्स करत रणवीरचं कौतुक केलं तर दीपिकाला आशीर्वाद दिले इतकंच नाही तर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला. इतक्या गर्दीत रणवीरने घेतलेल्या दीपिकाच्या काळजीमुळे अनेकांनी त्यालाही आशीर्वाद दिले आहेत.

अखेर सरोगसीच्या चर्चा थांबल्या

मध्यंतरी दीपिका सरोगसीद्वारे बाळा जन्म देणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पण दीपिकाचं तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचं आता सिद्ध झाल्यामुळे या चर्चा आता थांबल्या आहेत.

दीपिका आता पाच महिन्यांची प्रेग्नेंट असून फेब्रुवारीमध्ये तिने ती गरोदर असल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली होती. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर २०२४’ असं लिहिलं होतं.  या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांची चित्रं होती.

रणवीर आणि दीपिका सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ते त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करतील. सध्या दीपिकाने तिचं सगळ्या सिनेमांचं शूटिंग आटोपलं असून ती आराम करत आहे तर रणवीरही जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवत आहे.

ते दोघेही 'सिंघम अगेन' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. दीपिका लेडी सिंघमची भूमिका साकारणार आहे. याशिवाय दीपिकाचा फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि रणवीर 'रॉकी और राणी कि प्रेमकहाणी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Updates: राजकीय पक्षांच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला - राज ठाकरे

सायलीने गड राखला पण TRP मध्ये 'येड लागलं प्रेमाचं' ने मारली बाजी; झी मराठीच्या 'कमळी'ने सगळ्यांना टाकलं मागे, वाचा संपूर्ण रिपोर्ट

JJ Hospital Case: धक्कादायक! जेजे रुग्णालयात विद्यार्थिनीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, संतापजन कारण समोर

SCROLL FOR NEXT