ashok saraf salman khan sakal
Premier

Dharmaveer 2: 'धर्मवीर २'च्या ट्रेलर रिलीजला सलमानची अशोक सराफ यांना घट्ट मिठी; नेटकऱ्यांना आठवले करण- अर्जुन

Dhamaveer 2 Trailer Launch: लोकप्रिय अभिनेता सलमान खान याने 'धर्मवीर २' ट्रेलर रिलीजला हजेरी लावली होती. तेव्हा त्याने अशोक सराफ यांना मिठी मारली.

Payal Naik

Dharmaveer 2 Trailer: गेले अनेक दिवस ज्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे त्या 'धर्मवीर २'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला. 'धर्मवीर' चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभल्यानंतर आता 'धर्मवीर २' प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मोठ्या धुमधडाक्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या सोहळयाला मराठीसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान देखील हजर होता. आता त्याचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय ज्यात सलमान अभिनेते अशोक सराफ यांना घट्ट मिठी मारताना दिसतोय.

ashok saraf salman khan

'धर्मवीर २' च्या ट्रेलर लाँचला भाईजान सलमान खानसोबत अभिनेता गोविंदा आणि जितेंद्र कपूर यांनीही हजेरी लावली होती. तर मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि महेश कोठारे हे देखील हजर होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात सलमान खानची एंट्री होताच तो मंचावर जातो. मंचावर आधीपासून हजर असलेल्या अनेकांना तो हस्तोलंदन करतो. मात्र जेव्हा तो अशोक मामांना पाहतो तेव्हा ते दोघेही एकमेकांना पाहून हसतात आणि एक घट्ट मिठी मारतात. मोठी मारताना अशोक सराफदेखील खुलून हसताना दिसत आहेत तर त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटताना दिसत आहेत. इतरांपेक्षा थोडा जास्त वेळ तो मामांना मिठी मारतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावरून नेटकरीही सलमान आणि मामांच्या या भेटीचं कौतुक करत आहेत. आम्हाला तर ठाकूर तो गियो हा डायलॉग आठवला असं ते म्हणत आहेत. त्यांची मिठी पाहून सगळ्यांना 'करण अर्जुन' चित्रपट आठवला आहे. तर त्यानंतर सलमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मिठी मारताना दिसतो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रेक्षकांमध्ये व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT