Salman Khan Esakal
Premier

Salman Khan & Atlee : किंग खाननंतर 'जवान' फेम अॅटलीच्या सिनेमात झळकणार 'हा' अभिनेता; कधी रिलीज होणार चित्रपट?

Salman & Atlee new movie : अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक अॅ टली एकत्र सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

किंग खान शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा खूप गाजला होता आणि या सिनेमाचा दिग्दर्शक अॅ टलीचं कौतुक झालं होतं. साऊथ इंडस्ट्रीमधील गाजलेला दिग्दर्शक असलेल्या अॅ टलीने पदार्पणातच स्वतःची एक वेगळी छाप बॉलिवूडवर सोडली आणि आता तो आणखी एक नवा सिनेमा घेऊन येत असल्याची चर्चा आहे पण यावेळी तो शाहरुख बरोबर नाही तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबरोबर काम करतोय.

Salman Khan New Project : पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान (Salman Khan) आणि अॅ टली (Atlee) सध्या सिनेमाच्या चर्चेत व्यस्त असून सन पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,"सलमान खान (Salman Khan) आणि अॅ टली (Atlee) गेले वर्षभर एकमेकांच्या संपर्कात असून आणि त्यांनी अनेक कल्पनांवर चर्चा केलीये ज्यावर ते सिनेमा तयार करू शकतील. त्यांची चर्चा सकारात्मक रीतीने सुरु असून सलमान आणि अॅ टली यांच्या विचारांशी सिनेमाचा विषय जुळेल अशा विषयाचा ते शोध घेत आहेत. सलमानने या प्रोजेक्टला होकार दिला असून सध्या सिनेमाचं कथानक आणि पटकथेवर काम सुरु आहे."

येत्या महिन्याभरात दिग्दर्शक अॅ टली सलमानला सिनेमाची संपूर्ण कथा ऐकवणार असून त्यानंतर ते दोघे सिनेमाशी संबंधित तारखा आणि वेळापत्रकाविषयी चर्चा करतील. "२०२५ च्या सुरुवातील सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अॅ टली एक बिग बजेट आणि संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा विचार करत असून प्रेक्षकांना आवडेल अशा विषयावर सिनेमा बनवण्याच्या योजनेत सध्या तो व्यस्त आहे. हा सिनेमा सलमान खान आणि साऊथ इंडियन इंडस्ट्रीमधील ए लिस्ट सुपरस्टार कलाकारांना घेऊन बनवला जाणार आहे. सध्या यावर चर्चा सुरु असून हा सिनेमा बनवण्याविषयीची मागणी सगळीकडूनच वाढली आहे. " असं सूत्रांनी पुढे सांगितलं. अभिनेता रणवीर सिंहही (Ranveer Singh) या सिनेमात असल्याची चर्चा होती पण सूत्रांनी हे वृत्त नाकारलं असून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीकडेच लक्ष ठेवून हा सिनेमा बनवला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सलमानबरोबर आणखी कोणते कलाकार या सिनेमात दिसणार ? सिनेमाची कथा काय असणार ? शाहरुख ही या सिनेमात दिसणार का ? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडा काळ धीर धरावा लागणार आहे. लवकरच या संदर्भातील अपडेट्स सोशल मीडियावर जाहीर करण्यात येतील असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT