Sameer Vidwans 
Premier

Vasai Murder Case : 'पोलिसांचा धाक आहे का ?' ; वसई हत्या प्रकरणानंतर दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा प्रशासनाला सवाल

Sameer Vidwans Post on Vasai Murder : मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सध्या चर्चेत असणाऱ्या वसई हत्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा संताप व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

वसईतील गावराई पाडा येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी त्यांचा या बाबतीतील संताप व्यक्त करत आहेत. मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रशासनाला सवाल केला. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

समीर यांची पोस्ट

वसई प्रकरणावर समीर यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. त्यात ते म्हणाले,"वसईत एका मुलीचा तिच्या तथाकथित प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण खून केला. हे असं वारंवार होत असतं. भयानक आहे हे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्न आहेतच. पण आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी, इंग्रजी, महानगरपालिका, खासगी किंवा इतर..) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा? मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात? पालकांचेही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत? मला तरी असं वाटतं, की याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत."

मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक यांनी शालेय स्तरावर काम करावं अशी मागणी समीर यांनी सोशल मीडियावर मांडली आहे तसंच प्रशासनाच्या कारभारवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

किरण मानेंनीही व्यक्त केलं मत

अभिनेते किरण माने यांनीही वसई प्रकरणावर प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते म्हणाले,"वसईमधला तरूणीच्या हत्येचा व्हिडीओ पाहुन काळीज पिळवटलं. या तरूणीने याआधी या तरूणाबद्दल पोलीसांत तक्रार दिलेली होती ! गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या. तुम्ही विरोधी पक्षनेते होता तेव्हा भर कोरोनाकाळात सुशांतसिंग राजपूतसाठी घसा खरवडून कोकलत होतात. तुमच्या बुडाखाली त्याहून भयानक अपराध रोज घडताहेत. सोडा खुर्ची. लायक माणसाला बसवा तिथे."

नेमकं काय आहे प्रकरण ?

वसईमध्ये रोहित यादव या २९ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या आरती यादव या २२ वर्षीय तरुणीची लोखंडी पान्याने सपासप वार करत हत्या केली. मागील सहा वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि आरती इतर मुलांशी बोलत असल्याचा त्याला संशय होता. या वादातून त्याने तिची हत्या केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT