Hanuman ott release esakal
Premier

HanuMan OTT Release: बॉक्स ऑफिसवर 'हनुमान'ची कोटीच्या कोटी उड्डाणे आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

HanuMan OTT Release: तेजा सज्जचा हनुमान हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

HanuMan OTT Release: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तेजा सज्जाचा (Teja Sajja) हनुमान (HanuMan) हा 2024 मधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. तेजा सज्जचा हनुमान हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

चित्रपटाचं हिंदी व्हर्जन 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालं रिलीज

हनुमान या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन जिओ सिनेमावर रिलीज झालं आहे. जियो सिनेमावर लाखो लोकांनी हा चित्रपट हिंदी भाषेत पाहिला आहे. या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन ZEE5 वर प्रदर्शित झाले आहे. आता हा चित्रपट तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार चित्रपट

हनुमान हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हनुमान पाहण्यासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे."

'हनुमान' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

हनुमान चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेतच 52.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन जवळपास 200.32 कोटी रुपये होते. हनुमान चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. (Box office collection of 'Hanuman')

सिक्वेल कधी होणार रिलीज?

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रशांत वर्मा यांनी हनुमान या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT