Jackie Shroff esakal
Premier

Jackie Shroff: सेल्फी काढायला आला चाहता, अन् जग्गू दादांनी मारली जोरदार टपली; भिडूचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Jackie Shroff: जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॅकी श्रॉफ हे सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यात जोरदार टपली मारली.

priyanka kulkarni

Jackie Shroff: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे त्यांच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत.जॅकी श्रॉफ यांच्या बिंधास्त स्टाइलला प्रेक्षकांची पसंती मिळते. अशातच आता जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॅकी श्रॉफ हे सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यात जोरदार टपली मारली.

जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफच्या आजूबाजूला बरेच लोक थांबलेले दिसत आहेत. जॅकी हे हातात रोपे घेऊ उभे असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांचा एक चाहता त्यांच्या जवळ जातो. त्यानंतर त्या चाहत्याच्या डोक्यावर जॅकी श्रॉफ जोरदार टपली मारतात. जॅकी श्रॉफच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या कृत्यावर टीका केली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

एका नेटकऱ्यानं जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट केली "त्याला का मारलं? हे चुकीचं आहे.", तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तुम्ही अभिनेते आहेत, त्यामुळे तुम्ही कोणालाही मारु शकता, असं नाहीये."

पाहा व्हिडीओ:

जॅकी श्रॉफ यांची बिन्धास्त स्टाइल

जॅकी श्रॉफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण यासोबतच जॅकी हे त्यांच्या बिन्धास्त स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. यामुळे कधीकधी त्यांना ट्रोल देखील केलं जातं. जॅकी श्रॉफप्रमाणेच त्याचा मुलगा टायगरही चर्चेत असतो. टायगरचा बड़े मियां छोटे मियां हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मस्त में रहने का हा जॅकी श्रॉफ यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केले आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच नीना गुप्ता यांनी देखील काम केलं आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी मुंबईतील एका मध्यमवर्गीय भागात राहणाऱ्या व्ही. एस. कामत यांची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT