Nikki Tamboli & Janhavi Killekar Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : "तू सगळ्यात वाईट स्पर्धक...", निक्की तांबोळीला बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाचे खडेबोल ; जान्हवीलाही दिला डोस

Bigg Boss Marathi Ex contestant trolled Nikki Tamboli : बिग बॉस मराठी सीजन ५ मधील स्पर्धक निक्की तांबोळीला तिच्या वागण्यामुळे बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने खडेबोल सुनावले तर जान्हवीलाही कानपिचक्या मिळाल्या.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 5 Latest Update : बिग बॉस मराठी सीजन ५ पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. अगदी पहिल्याच आठवड्यात अभिनेत्री निक्की तांबोळी या सीजनची व्हिलन ठरली आहे. तिचा घरातील वावर अनेकांना खटकतोय. बिग बॉस मराठी सीजन ३ चा उपविजेता जय दुधानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निक्कीला खडेबोल सुनावले.

जयने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीमध्ये निक्की आणि जान्हवीसाठी खास पोस्ट शेअर केली. यावेळी त्याने स्पर्धक अभिजीत सावंतचंही कौतुक केलं. तर वर्षा उसगांवकर यांचा घरात होणाऱ्या अपमानाबद्दलही तो व्यक्त झाला.

जयने सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलं कि,"निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सगळ्यात वाईट स्पर्धक आहे." तर जान्हवीविषयी बोलताना म्हणाला कि,"अभिजीत सावंतचं कौतुक कि त्याने जान्हवी उर्फ बुगु बुगुला दाखवून दिलं कि ती आपल्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार असलेल्या वर्षा ताईंबरोबर कशी वागली आहे ते. हे खूपच भयंकर आणि अपमानास्पद होतं. मी ज्या सिजनमध्ये खेळलो तिथे माझंही अनेकांशी भांडण झालं पण मला अजूनही लक्षात आहे आमच्यातील एकाही स्पर्धकाने कोणत्याही सिनियर स्पर्धकाचा अपमान केला नाही."

Jay Dudhane Post
Jay Dudhane Post

याबरोबरच जयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. महेश मांजरेकर यांनी अमोल परचुरे यांना मुलाखत दिली आहे त्याची छोटीसी झलक यात पाहायला मिळतेय. यात मांजरेकर जय विषयी बोलताना दिसले. ते म्हणाले कि,"जय दुधाने हा असा स्पर्धक होता कि त्याला मी कितीही सांगितलं तरीही त्याने त्याचं वागणं बदललं नाही. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा मी त्याला म्हणालो कि, तू जरा माझं म्हणणं ऐकलं असतंस तर तो शो तू जिंकला असतास." जयने याबद्दल महेश यांचे आभार मानले.

बिग बॉस मराठीच्या कालच्या २ ऑगस्टच्या भागात पाहायला मिळालं कि, जान्हवी आणि निक्की मुद्दाम खाली झोपल्या म्हणजे वर्षा यांना वाटेत झोपायला लागेल. यावरून अभिजीत सावंतने जान्हवीला दुसऱ्या दिवशी सुनावलं. वर्षा यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीवरून निक्की आणि जान्हवीवर सर्व स्तरातून टीका होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : शिक्षणमंत्र्यांच्या बाजूच्या जिल्ह्यातच शिक्षण व्यवस्थेचे वाजले तीन तेरा...

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT