Kangana Ranaut,Amitabh Bachchan esakal
Premier

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

व्हिडीओमध्ये कंगना ही स्वत:ची तुलना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत करताना दिसत आहे. कंगनाचा भाषणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ही तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचं तिकीट मिळाले आहे. कंगना ही सध्या निवडणुकीचा प्रचार करत आहे. सध्या कंगनाचा प्रचारादरम्यान केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ही स्वत:ची तुलना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत करताना दिसत आहे. कंगनाचा हा भाषणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

काय म्हणाली कंगना?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कंगना एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहे. या भाषणादरम्यान कंगना म्हणते, "मी राजस्थानला गेले, पश्चिम बंगालला गेले, दिल्लीत गेले किंला मणिपूरला गेले तरी मला लोकांचे इतकं प्रेम मिळते आणि आदर मिळतो, हे मी ठामपणे सांगू शकते. अमिताभ बच्चन यांच्यानंतर आज इंडस्ट्रीत कोणाला एवढं प्रेम मिळत असेल तर ती व्यक्ती मी आहे."

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

कंगनाच्या वक्तव्याची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्यानं कंगनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट केली, "हा वर्षातला सर्वात चांगला जोक आहे" तर दुसऱ्या युझरनं म्हटलं, "स्वत:च्या तोंडून स्वत:च कौतुक करत आहे"

काही दिवसांपूर्वी कंगनानं स्वत:ची तुलना शाहरुख खानसोबत देखील केली होती. शाहरुख खानच्या करिअरच्या ग्राफची तुलना कंगनानं तिच्या मणिकर्णिका आणि क्वीन यांसारख्या चित्रपटांसोबत केली. ती म्हणाला की, "मी आणि शाहरुख खान अशा प्रकारचे स्टार नाहीत जे ओटीटीद्वारे चमकतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT