Emergency Release Date Postponed sakal
Premier

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, टीम म्हणाली, "आमची क्वीन सध्या देशाप्रती..."

Emergency Release Date Postponed: कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Kangana Ranaut Movie Emergency: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचं तिकीट मिळाले आहे. सध्या ती निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. अशातच आता कंगनाच्या इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. कंगनाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पण या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यानं कंगनाचे चाहते नाराज झाले आहेत.

चित्रपटाच्या टीमची पोस्ट

इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत या चित्रपटाच्या टीमनं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "आमची क्वीन कंगना रणौत हिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. कंगना ही सध्या तिचं देशाप्रती असलेले तिचे कर्तव्य आणि देशसेवेची तिची बांधिलकी, या गोष्टीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे आमच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला लवकरच नवीन रिलीज डेट सांगू. तुमच्या सपोर्टसाठी आम्ही तुमचे आभार मानतो."

इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी चित्रपट यापूर्वी 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची माहिती या अजून देण्यात आली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही कंगनाने केले आहे.

इमर्जन्सी या चित्रपटात कंगनासोबतच अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: श्रेयस अय्यरने अफलातून कॅच घेतला, पण त्यामुळे करावं लागलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं...

"मी लहान असताना माझे वडील वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये.." बालपणाबद्दल हर्षवर्धनचा धक्कादायक खुलासा

Mohol Accident : एसटी बस व ट्रॅक्टरच्या अपघातात तिघे जण जखमी; एक जण गंभीर

Latest Marathi News Live Update : रिल बनवणं जीवावर बेतलं! रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Thane News: भिवंडीत दोन गटांत हाणामारी! माजी महापौरांसह ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT