Kartik Aaryan with his mother Esakal
Premier

Kartik Aaryan : जेव्हा कार्तिक आर्यनने परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिली 'प्यार का पंचनामा २' ची गोष्ट ; आईने केली पोलखोल

Kartik Aaryan in Kapil Sharma's Show : अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईने कार्तिकच्या इंजिनिअरिंग काळातील खास आठवणी शेअर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतीच त्याची आई माला तिवारीबरोबर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नेटफ्लिक्सवरील कार्यक्रमात हजेरी लावली. या शोमध्ये माला यांनी कार्तिकच्या इंजिनिअरिंग शिकत असतानाच्या काही खास आठवणी शेअर केल्या. त्यांना त्यांचं काम सोडून कार्तिकचा अभ्यास घेण्यासाठी मुंबईत यावं लागलं होतं असं त्यांनी यावेळी शेअर केलं.

या कार्यक्रमादरम्यान माला यांनी शेअर केलं कि, कार्तिक परीक्षेत सतत फेल होत होता आणि नापास व्हायची कायम काही ना काही कारण सांगायचा जसं कि तो आजारी होता वगैरे पण खरंतर तो या काळात तो सिनेमासाठी ऑडिशन्स देत होता. त्याने ही गोष्ट त्यावेळी त्याच्या पालकांना अजिबात सांगितली नव्हती. माला यांनी सांगितलं कि,"त्याला सिनेमाचं वेड होतं. लहान असल्यापासून तो आवडीने सिनेमे बघायचा पण त्याने कधीच आम्हाला हे सांगितलं नाही."

कार्तिकने त्याच्या सिनेइंडस्ट्रीत काम करण्याच्या स्वप्नाबद्दल त्यांना कधी सांगितलं हा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या कि,"एक दिवशी त्याचा फोन आला आणि तो रडत होता आणि त्याने मला सांगितलं 'मम्मी मला मिळाली. मी ऑडिशनमध्ये पास झालो. मला फिल्म मिळाली.' ते ऐकल्यावर मी पण रडू लागले. त्याने मला विचारलं कि मी का रडतेय. त्यावर मी म्हंटलं कि, मला वाटत नव्हतं कि अभिनेता व्हावंसं. मला वाटायचं कि तू डॉक्टर व्हावंसं किंवा इंजिनिअर व्हावंसं. " कार्तिकने इंजिनीअरिंग कस पूर्ण केलं याचाही त्यांनी भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला. त्या म्हणाल्या कि,"कार्तिकला आम्ही मारून मुटकून इंजिनिअर केलं आहे. त्याला प्रत्येक सहामाहीत केटी लागत होती तेव्हा मी त्याला प्रिन्सिपलकडे घेऊन गेले आणि त्यांना याला डिग्रीचं महत्त्व समजवायला सांगितलं तेव्हा कार्तिकने इंजिनिअरिंगला जरा गांभीर्याने घेतलं आणि चार वर्षांची डिग्री दहा वर्षांत पूर्ण केली." त्यावर कार्तिकने आईची चूक दाखवत पाच वर्षांत पूर्ण केल्याचं सांगितलं.

पुढे त्या म्हणाल्या कि," आकाशवाणी सिनेमाच्या वेळेला त्याने एक थर्ड हॅन्ड कर विकत घेतली होती. तो शुटिंगवरून कॉलेजला जायचा. मी माझं सगळं काम सोडून मुंबईत त्याचा अभ्यास घ्यायला आले होते. मी कारमध्ये त्याच्या बाजूला बसायचे आणि त्याचा अभ्यास घ्यायचे. महत्त्वाच्या व्याख्या मी त्याला वाचायला सांगायचे. त्याचा पेपर होईपर्यंत मी तीन ते चार तास बाहेर बसून असायचे आणि तो पेपर देऊन आला कि विचारायचे कि पेपरमध्ये काय लिहिली तर त्यांना मला सांगितलं कि प्यार का पंचनामा २ ची स्टोरी लिहिली."

दरम्यान, त्या हे सांगायला विसरल्या नाहीत कि, कार्तिकच्या सिनेइंडस्ट्रीतील यश पाहून त्यांनी अखेर मान्य के कि त्याने त्याच्यासाठी योग्य करिअर निवडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

IPS Anjana Krishna: 'आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षण, १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ मराठा कुटुंबांना मदतीचा दिलासा

SCROLL FOR NEXT